Mutual Fund : म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी नक्कीच वाचा; नाहीतर होईल प्रचंड नुकसान!
आजच्या डिजिटल युगात सर्वकाही ऑनलाईन होत आहे, जीवनमान तंत्रज्ञान जसे बदलले तस तसें सर्व गोष्टींचे प्रकार बदलले जसे की पैसे काढणे, भरणे, पाठवणे हे ऑनलाईन झाले तस तसेच साठवण्याचे मार्ग सुद्धा ऑनलाईन उपलब्ध झाले.
सेविंग खाते, फिक्स्ड डिपॉझिट, ही काही पैसे गुंतवणूक करण्याची हमखास ठिकाणे पण आज आम्ही तुम्हाला एका नवीन व दर्जेदार मार्ग सांगणार आहोत, हो तो म्हणजे म्युच्युअल फंड. यामध्ये गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील तेजीचा फायदा तर होतोच, पण पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असल्याने तोटा हा जवळपास 0 च्या बरोबरच म्हणावा लागेल अर्थात फक्त फायदाच होतो म्हणले तरी चालेल. शेअर मार्केट प्रमाणे यात रोज नवं नवीन स्टॉक्स शोधा पैसे लावा त्याची नफा मिळण्याची वाट पाहा ही झंझट यात नाही, जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी नक्कीच तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
किती दिवसांचा वेळ?
बाजाराचे नियमन करणाऱ्या सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मार्च महिन्यात एक परिपत्रक जारी केले असून, परिपत्रकानुसार म्युच्युअल फंड धारकांना नॉमिनी नाव नोंदणी अथवा जाहीर करण्यासाठीची मुदत निश्चित केली होती. 30 सप्टेंबर 2023 ही शेवटची तारीख होती ही मुदत संपण्यास आता फक्त दोन आठवड्यांचा अवधी शिल्लक आहे.
काय होईल मुदत संपल्यानंतर?
यापूर्वी ही मुदत 31 मार्च 2023 रोजी संपत होती. खरं तर, SEBI ने 15 जून 2022 रोजी या संदर्भात सर्वप्रथम एक परिपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये 31 मार्च 2023 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर सेबीने 28 मार्च रोजी नवीन परिपत्रक जारी केले आणि 30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली. सेबीने स्पष्टपणे सांगितले होते की, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी नॉमिनीबाबत अंतिम मुदतीपर्यंत स्थिती स्पष्ट केली नाही, तर त्यांचे फोलिओ गोठवले जातील. म्हणजेच जे गुंतवणूकदार आपल्या म्युच्युअल फंड खात्याला नॉमिनी जाहीर अथवा नोंद करणार नाहीत त्यांची गुंतवणूक स्थगित करण्यात येणार आहे.
यावर उपाय?
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या फोलिओचे स्थगितीकरण थांबवण्यासाठी दोन उपाय आहेत. पहिला उपाय म्हणजे नॉमिनी सबमिट करणे म्हणजे एखाद्याला नॉमिनी बनवणे मग तो कोण हे तुम्ही ठरवू शकता उदा. आई, वडील, बायको, मुले. दुसरा पर्याय म्हणजे नामांकन ( नॉमिनी) रद्द करणे. जर तुम्हाला कोणालाच नॉमिनी करायचे नसल्यास तर तुम्हाला तसें जाहीर करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल. ज्यात तुम्ही असे नमूद करता की तुम्ही स्व इच्छेने कोणाला ही नॉमिनी जाहीर करत नाही.
म्युच्युअल फंडमध्ये संयुक्त खाते (Joint Account in Mutual Fund )असल्यास पर्याय?
जर म्युच्युअल फंड एकापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र खरेदी केला असेल, म्हणजेच खाते वैयक्तिक नसून संयुक्त असेल, तर अशा परिस्थितीत सर्व संयुक्त धारकांनी एकत्र येऊन नॉमिनी ठरवावे लागेल. मग तो त्याच खात्यातील व्यक्ती असू शकतो किंवा बाहेरील कोणीही ते तुम्ही ठरवू शकता.
सध्या ट्रेंडिंग 👉
(Disclaimer: म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागार, तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा)