बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) प्रादेशिक ग्रामीण बँक्स (RRB) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) परीक्षा ही एक अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे.
ibps rrb po ची परीक्षा रद्द
IBPS RRB PO परीक्षेची शिफ्ट 1 06 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9:00 ते 9:50 AM पर्यंत घेण्यात आली होती. परीक्षे दरम्यान सिस्टम हँगची समस्या भेडसावत होती, त्यामुळे अनेक उमेदवारांना याचा फटका बसला. तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा प्रक्रियेत व्यत्यय तर आलाच शिवाय परीक्षार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ आणि अनिश्चितता निर्माण झाली. परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी ही बाब तत्काळ परीक्षा निरिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
IBPS ने परिस्थितीचा विचार केला आणि IBPS RRB PO परीक्षेची शिफ्ट 2 रद्द करण्याचा निर्णय घेतला.
IBPS RRB PO 2023 परीक्षा रद्द अधिकृत अपडेट
IBPS ने 6 ऑगस्ट 2023 रोजी IBPS RRB PO परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना सूचित करणारी अधिकृत सूचना जारी केली आहे. शिफ्ट I दरम्यान सिस्टीम हँग होत असल्याचे नोटीसमध्ये मान्य करण्यात आले आहे आणि उमेदवारांना त्यांच्या तक्रारी मान्य करण्यात आल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. IBPS ने सांगितले की शिफ्ट 1 आणि 2 चे रीशेड्युलिंग आणि इतर तपशील अधिकृत IBPS पोर्टलद्वारे कळवले जातील. अधिक माहितीसाठी उमेदवारांना IBPS वेबसाइटला भेट देत राहण्याचा सल्ला दिला आहे.