Buy Gold Without Pan Card :भारतात दिवाळीला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. दिवाळीचा शुभ दिवस साधून आपण सोने खरेदी करतो. यंदा दिवाळीसोबत लग्नाचाही हंगाम आहे. त्यामुळे या वेळी लोक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहेत, त्यामुळे जस जशी दिवाळी जावळ येत आहे तशी सोन्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे.
पण पेन आणि आधार कार्डशिवाय तुम्ही एकावेळी किती सोने खरेदी करू शकता हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल तर चला जाणून घेऊया सोने खरेदीशी संबंधित काही नियम आणि कायदे.
सोने खरेदी आणि सोने जवळ ठेवण्याशी संबंधित आयकर आणि इतर काही सरकारी नियम आहेत. जे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही या नियमांचे उल्लंघन केले तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. चला तर मग जाणून घेऊया या नियमांबद्दल.
हेही वाचा 👉 Cibil score : वारंवार तपासणीमुळे सिबिल स्कोअर कमी होतो, जाणून घ्या RBI चे नियम.

हेही वाचा 👉 10 ग्रॅम सोने 54,000 रुपयांना खरेदी करा, थेट 7000 रुपयांची बचत!.
आधार आणी पॅन कार्डशिवाय सोने खरेदी करण्याची मर्यादा
जाणून घ्या किती सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला पॅन आणी आधार कार्ड दाखवावे लागेल…
तुम्ही 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे सोने खरेदी केल्यास तुम्हाला पॅन किंवा आधार कार्ड दाखवावे लागेल. सोन्यावरील हा नियम आयकर कलम 114B अंतर्गत संपूर्ण देशात लागू आहे. 1 जानेवारी 2016 पूर्वी, जर तुम्ही 5 लाख रुपयांच्या वर सोने खरेदी केले तर त्यानंतर तुम्हाला पॅन किंवा आधार कार्ड दाखवावे लागत होते. मात्र आता हा नियम बदलून पॅन कार्डशिवाय सोने खरेदी करण्याची मर्यादा दोन लाखांवर आणण्यात आली आहे. काळा पैसा रोखण्यासाठी हा नवा नियम लागू करम्यात आला आहे.
हेही वाचा 👉 Gold identify : दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या खरे आहेत की बनावट, हे आहेत ओळखण्याचे 4 मार्ग.