How much gold can keep at home legally in india : सोने खरेदी करणे आणि सोन्याचे दागिने घालणे हे प्रत्येकाला आवडते. दागिन्यांबरोबरच लोक सोन्याची बिस्किटे,नाणी वगैरे खरेदी करतात आणि जवळ ठेवतात. भारताबद्दल बोलायचे झाले तर भारतातही लोक घरात सोने ठेवतात.
मात्र माहितीअभावी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरतर घरात किती सोने ठेवता येईल याबद्दल लोकांना माहिती नसते. वास्तविक यासाठी सरकारने मर्यादा घालून दिली आहे. याबाबत कराचे स्वतंत्र नियम आहेत. हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
कायदेशीररीत्या घरात किती सोने ठेवता येते : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोने किंवा दागिने खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही त्याचे बिल मागून घेतलेच पाहिजे आणि ते बिल नेहमी जपून ठेवले पाहिजे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या परिपत्रकात असे म्हटले आहे की सोन्याचे दागिने ठेवण्यावर कोणतीही मर्यादा नाही, परंतु तुम्हाला त्याचा स्रोत देखील दाखवावा लागेल. आणी आपण दाखवलेल्या पुराव्यात छेडछाड किंवा गडबड झाल्यास तुमचे सोने जप्त केले जाऊ शकते.
देशात किती सोने कोण ठेवू शकते याबाबत सीबीडीटीचे काही नियम आहेत. यानुसार, तुम्ही या मर्यादेपेक्षा जास्त सोने जवळ ठेवू शकता, तुमच्याकडे असलेले सोने तुमच्याकडे कुठून आले याचे उत्तर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. नियमांमध्ये असेही म्हटले आहे की जर मर्यादित आणी स्रोत असणारे सोने घरात असेल तर शोध मोहिमेदरम्यान अधिकारी घरात सापडलेले सोने किंवा सोन्याचे दागिने जप्त करू शकत नाहीत,
तुम्हाला हे माहित आहे का 👉 दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या खरे आहेत की बनावट, हे आहेत ओळखण्याचे 4 मार्ग.
कोण किती सोने ठेवू शकतो?
विवाहित महिला आपल्याजवळ 500 ग्रॅम सोने ठेवू शकते. तर अविवाहित महिला आपल्याकडे 250 ग्रॅम सोने सोबत ठेवू शकते. एक माणूस 100 ग्रॅम सोने सोबत ठेवू शकतो.
सोन्याचा आजचा भाव 👉 सोन्याचे दर इतके उतरले, जाणून घ्या आज 8 नोव्हेंबर 2023 रोजी सोन्याचा दर किती आहे.
सोन्यासंबंधी कर नियम
तुम्ही तुमच्या घोषित उत्पन्नातून किंवा शेतीतून कमावलेल्या पैशातून सोने खरेदी केले असेल, तर त्यावर कोणताही कर लागणार नाही. याशिवाय, जर तुम्ही घरगुती खर्चात बचत करून सोने खरेदी केले असेल किंवा तुम्हाला वारसाहक्काने सोने मिळाले असेल तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागणार नाही. त्याच बरोबर , सोन्याचा स्त्रोत देखील माहित असणे आवश्यक आहे.
पण ठेवलेल्या सोन्याच्या विक्रीवर तुम्हाला कर भरावा लागेल. तुम्ही सोने तीन वर्षे ठेवल्यानंतर विकल्यास, तुम्हाला या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर २० टक्के दराने दीर्घकालीन भांडवली नफा कर भरावा लागेल.
तुम्ही सोने खरेदी केल्यापासून तीन वर्षांच्या आत विकल्यास, त्यातून मिळणारे उत्पन्न तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाईल आणि तुम्ही करदाते म्हणून ज्या टॅक्स स्लॅबमध्ये बसता त्यानुसार कर आकारला जाईल.