Loan Rates Increased : एचडीएफसीचे कर्ज झाले महाग, बँकेने वाढवला एमसीएलआर
MCLR म्हणजे काय?
MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस् आधारित कर्ज दर, हा किमान व्याजदर असतो. जो कर्ज घेण्यासाठी बँकेकडून आकारला जातो. हा सर्व प्रकारच्या कर्जांसाठी बेंचमार्क म्हणून काम करते. म्हणून यात बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम बँकेवर होत असतो.
HDFC Increases MCLR : नुकतीच एचडीएफसी बँकेने कर्जदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. एमसीएलआर वाढल्यामुळे याचा थेट परिणाम वाहन कर्ज, गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज त्याच बरोबर सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरावर होईल. त्यामुळे कर्जाचा EMI देखील वाढेल.
(hdfc mclr rate increased) भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीने (HDFC) नुकतीच कर्जदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेने MCLR मध्ये 0.15 % इतकी वाढ केली आहे. बँकेचा (MCLR) एमसीएलआर वाढवल्याने आता वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज आणि वाहन कर्जासह ईतर सर्व प्रकारच्या कर्जाचा हफ्ता वाढणार आहे. नवीन एमसीएलआर दर 7 ऑगस्ट 2023 पासून लागू झाले आहेत.
(EMI Increased) ईएमआय वाढणार
एचडीएफसी बँकेने MCLR दर वाढवल्यामुळे आता याचा परिणाम नवीन कर्ज घेणाऱ्या व जुन्या कर्जदारांवरदेखील होणार आहे. कर्जावर आता वाढलेल्या दराने व्याज आकारले जाईल.
हेही वाचा :
• 5 Days Banking News: भारतीय बँका संदर्भात म्हणत्वाची बातमी.
• ओला इलेक्ट्रिक 15 ऑगस्ट रोजी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर S1X लाँच करेल! जाणून घ्या किती असेल किंमत.
नवीन व्याजदर
• एका महिन्यासाठी MCLR 7.95 टक्क्यावरून 8.10 टक्के झाला आहे.
• तीन महिन्यासाठी MCLR 8.40 टक्के झाला आहे.
• सहा महिन्यांच्या कालावधीत MCLR 8.80 टक्के झाला आहे.
• एका वर्षाचा MCLR आता 8.5 टक्क्यावरून 9.05 टक्के झाला आहे.
• दोन वर्षांचा MCLR 9.10 टक्के झाला आहे.
• तीन वर्षाचा MCLR 9.20 टक्के झाला आहे.