Google Pay Loan : दिवसेंदिवस जग जसे प्रगत होत चालले आहे तसतसे सुखसोई वाढत चालल्या आहेत पण त्या सुख सुविधांचा लाभ घेण्यासाठी मिळणारा पगार किंवा पैशाचा स्त्रोत तो मात्र पूर्वीसारखाच राहिला आहे. त्यामुळे बरेच लोक कर्ज काढून घरे बांधतात किंवा गाड्या घेतात किंवा इतर काही कामांसाठी सुद्धा कर्ज घेणे पसंद करतात. जेव्हापासून आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झाले व व ऑनलाईन ट्रांजेक्शन नी उंच भरारी घेतली तेव्हापासून लोन मिळणे म्हणजे कर्ज घेणे ही सुद्धा गोष्ट ऑनलाईनच सुरू व्हायला लागली आता तर काही कंपन्या किंवा संस्था पाच मिनिटात ऑनलाइन कर्ज देतात.
गुगल पे कर्ज : आज-काल रोखीने होणारे व्यवहार जवळपास कमी झाले असून आजकाल सर्वजण ऑनलाइन पेमेंट मेथड गुगल पे किंवा फोन पे युज करतात.
आज-काल भाजी विक्रेत्यांपासून ते मॉल पर्यंत कुठेतरी गेला तरी तिथे तुम्हाला स्कॅनर मिळतो व सर्वजणच मोबाईल वरून स्कॅन करून गुगल ते अथवा फोन पे वरून पेमेंट करतात. यामुळे सुट्टे पैशाची देवघेव व खीशातून जास्त बाळगावी लागणारी कॅश हा त्रास कमी झाला.
आज ऑनलाईनच्या जगात लोन देणाऱ्या खऱ्या कंपन्या ह्या खूप कमी व बनावट किंवा फर्जी कंपन्या वाढल्या आहेत. गुगल पे ने ही कर्जाची सुविधा उपलब्ध करून ह्यापासून मुक्ती दिली आहे. गुगल पे ने यासंदर्भात डीएमआय फायनान्स कंपनीशी डील केली आहे. शिवाय गुगल पे ने एक क्रेडिट लाईन चालू केली असून यासाठी ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्याशी पार्टनरशिप केली आहे.
किती मिळेल गुगल पे कर्ज
गुगल पे ने सध्या ही सुविधा छोट्या मोठ्या व्यावसायिक धारकांसाठी सुरू केले असून त्याच्या अंतर्गत सध्या फक्त पंधरा हजार रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे. व या कर्जाला महिन्याला फक्त 111 रुपयांचा हप्ता बसणार आहे. त्यामुळे गुगल सारख्या विश्वासू संस्थेकडून हे कर्ज घेणं छोट्या व्यापाऱ्यांना भरपूर फायदा देणार आहे.
गुरुवारी झालेल्या गुगलच्या भारतातील इव्हेंटमध्ये गुगलने ही घोषणा केली.
👉 Rahu Gochar 2023 : या तीन राशींचे नशीब फळफळणार, राहू करतोय या राशीत प्रवेश होतील सर्व इच्छा पूर्ण.