Gold Silver Rate Today 16 October 2023 : सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून, एकाच आठवड्यात दोन्ही धातूंनी उच्चांकी झेप घेतली. आता नवरात्री, दसरा, दिवाळी असे सणासुदीचे दिवस चालू झाल्यामुळे शिवाय इस्त्राईल-हमास युद्धामुळे आपल्याला भाव वाढल्याची बातमी आहे.
आज 16 ऑक्टोबर 2023 रोजी सोन्याचा चांदीचा दर : भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीने गेल्या आठवड्यात उच्चांक गाठला. गेल्या सात महिन्यातील सोन्या चांदीचा दरातील हा सर्वात उच्चांक असून जवळपास तीन टक्क्यांनी किमती वाढल्या आहेत. (Gold Silver Price Today 16 October 2023). सोन्या-चांदीच्या किमती स्वस्त होणार असे वाटत होते पण भाव वाढल्याने ग्राहकांची निराशा होत आहे.
आठवडाभरात भावात वाढ
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दोन्ही धातूच्या किंमती जाहीर करते. त्यानुसार एका आठवड्यात सोन्यात 1800 रुपयांची तर चांदीमध्ये 2500 रुपयांची वृद्धी झाली. 6 ऑक्टोबरला 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,555 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर या 13 ऑक्टोबर रोजी प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,396 रुपये होता. या किंमती 1,841 रुपयांनी वाढल्या असून चांदीचा भाव 67,204 रुपयांहून 69,731 रुपयांवर पोहचला. चांदी एका किलोमागे 2,527 रुपयांनी वाढली.
भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची जुनी व विश्वासू संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही. व यांनी जाहीर केलेला भाव पूर्ण देशभरात मान्य केला जातो.
16 ऑक्टोबर 2023 रोजी सोन्याची किंमत काय
आठवडाभरात सोने झपाट्याने वाढले असून 6 ऑक्टोबरला सोने 70 रुपयांनी वधारले होते. 8 ऑक्टोबरला 440 रुपयांची वाढ झाली. 9 ऑक्टोबर रोजी 220 रुपयांनी किंमती वधारल्या. 10 ऑक्टोबर रोजी किंमतीत 330 रुपयांची वाढ झाली. 1600 रुपयांपेक्षा अधिकची झेप सोन्याने घेतली आहे. 22 कॅरेट सोने 54,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,060 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
चांदीत मोठी वाढ
चांदीत या महिन्याच्या सुरुवातीला पडझड झाली होती. पण आता इस्त्राईल-हमास युद्धाचा परिणाम दिसून येत आहे. 7 ऑक्टोबर रोजी चांदी 1500 रुपयांनी वाढली. तर 9 ऑक्टोबर रोजी किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली. 11 ऑक्टोबर रोजी चांदी 500 रुपयांनी घसरली. 12 ऑक्टोबर रोजी किंमती 500 रुपयांनी वाढल्या. सध्या एक किलो चांदीचा भाव 72,600 रुपये आहे. अशा रीतीने चांदी ही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जात असल्याचे दिसून येत आहे.