Gold Silver Price Today 2023: ऐन सणासुदीच्या काळात अचानक स्वस्त झाले सोने; 10 ग्रॅम सोन्याचा दर फक्त इतका!
Gold Silver Price Today, 18 September 2023
सोन्याचा भाव आज, 18 सप्टेंबर 2023: सध्या सनासुदीचे दिवस चालू असून गणेश चतुर्थी अगदी काही तासांवर येऊन टेकली आहे तर नवरात्र, दसरा आणी दिवाळी हे सुद्धा जवळच आले आहेत शिवाय लवकरच लग्नाचा हंगाम पण सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत प्रत्येकजण सोन्याचे दागिने खरेदी करु पाहत आहे. सोने हे आपल्या सर्वांनाच आवडत असून लग्नात मुलं किंवा मुलींना सोने व सोन्याचे दागिने देण्याची एक प्रथाच आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.
आज म्हणजेच सोमवारी (18 सप्टेंबर 2023) पुन्हा एकदा सोन्याच्या दरात बदल दिसून आला आज गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 220 रुपयांनी वाढ झाली असून 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 59,670 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 54,700 रुपये आहे.
भारतातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात बदल दिसून आला आहे. सर्वप्रथम, जर आपण राजधानी दिल्लीबद्दल बोललो तर आज 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 54,850 रुपये आहे. राजधानीत 24 कॅरेट सोन्याचा दर 59,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हे देखील वाचा 👉 Budhaditya Rajyog 2023 : ऑक्टोबर महिन्यात बुधादित्य राजयोग हा खास राजयोग चमकवणार ‘या’ 3 राशींचं नशीब.
सोन्याचांदीची आजची किंमत, १८ सप्टेंबर २०२३ | Gold Silver Price Today 18 September 2023
Gold Silver Price Latest News 👉 गणेश चतुर्थी च्या आधल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत जोरदार वाढ; लेटेस्ट दर येथे पाहा.
मुंबईत आजचे सोन्याचे भाव
महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी मुंबई मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम59,670 इतकी असून 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 54,700 इतका भाव नोंदवण्यात आला आहे
चांदीचा भाव
भारतातील चांदीचा दर आज 71,900 रुपये प्रति किलो असून गेल्या २४ तासांत चांदीच्या दरात फार नाही तर किरकोळ बदल झाला आहे. जर तुम्हाला तुमच्या या सनासुदीसाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी सोने चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे कारण पुढील सन व लग्न सराईचा हंगाम पाहता सोने चांदी चे दर खूपच वाढतील अशी शंका आहे.
घरबसल्या बघा सोन्याची किंमत
जर तुम्ही सराफा बाजारातुन सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन तुम्ही घरबसल्या चालू सोने चांदीच्या भावाची माहिती मिळवू शकता. तुमच्या फोनवर एक संदेश (Sms) येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर सहजपणे नमूद केलेले असतील.