Dasara 2023 Gold Rate Today : आज दसरा, दसऱ्याला एकमेकांना सोने (आपट्याची पाने ) वाटले जाते व सोने घ्या व सोन्यासारखे रहा असे बोलले जाते त्याचबरोबर सोने-चांदीच्या बाजारपेठेत सुद्धा सोने खरेदी केले जाते त्यामुळे आज सोन्याचा दर वाढणार हे निश्चितच होते.
Gold Silver Rate Today : आज नवरात्र संपणार आणी देशभरात आज विजयादशमी दसऱ्याची (Vijayadashami Dasara) चाहूल आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी (Gold Rate Today) सराफा बाजारात प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. दसऱ्यानिमित्त सराफा बाजारात उत्साह पाहायला मिळत असून दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचे (Gold rate on Dasara) भाव तुलनेनं वाढले असल्याचं दिसत आहे. मुंबईत सोन्याचे दर प्रति तोळा 62 हजार 500 रुपयांवर (Mumbai Gold Rate) आहे. काल मुंबईत सोन्याचा भाव प्रति तोळ्याला 62 हजार 400 होता.
👉 Dasara 2023 Upay: आज रात्री एका लिंबूचा करून बघा हा साधा उपाय ; भिकारी सुद्धा बनेल करोडपती.
Dasara 2023 Gold Rate Today : दसऱ्याच्या मुहूर्तावर गेल्या आठवड्यापासून आतापर्यंतची सराफ बाजारातील गर्दी पाहता सोन्याचा दर हा 63 हजार रुपयांच्या वरती जाईल असे चिन्ह होते पण तसे घडले नाही व फक्त 100 रुपयांनी सोने वाढले आहे. जळगाव सराफ बाजारात (Jalgaon Gold Rate) सोने दर 61 हजार 300 रुपयांवर आहे. जीएसटीसह एक तोळे सोन्याचा दर 63 हजार 139 रुपयांवर जातो.
Dasara 2023 Gold Rate Today : गेल्या काही दिवसात सणांवर सण जसे की गणपती त्यानंतर नवरात्र, दसरा आणि त्यानंतर येणारी दिवाळी अशा सणास्सुदीच्या सिझनमध्ये आणि त्यानंतर जशी दिवाळी संपेल तसे लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असल्यामुळे सोन्या चांदीचे दर वाढणार हे निश्चितच होते. जळगाव सुवर्ण नगरीत गेल्या 48 तासात 24 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 1000 रुपयांची वाढ झाली आहे. तीन दिवसांपूर्वी 60000 रुपये असलेले सोने सोमवारी 61000 हजार रुपये दरावर पोहोचलं होतं. आज सोन्याचा दर 61 हजार 300 आहे.
नक्की बघा 👉 दसऱ्याच्या दिवशी भारतात ‘या’ ठिकाणी साजरा केला जातो शोक.