Gold rate today 14 October 2023: आज सोन्याचा भाव: उद्यापासून म्हणजेच रविवार 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्री (शारदीय नवरात्री 2023) सुरू होत आहे. सनातन धर्मात नवरात्रीचा सण शुभ मानला जातो. या उत्सवादरम्यान माँ दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. असे केल्याने आपल्या सर्व मनोकामना पुऱ्या होतात असे मानले जाते.
14 October 2023 Gold Price : नुकताच गणेशोत्सव पार पडला असून नवरात्री ही जवळपास सुरूच होत आहे आणि आता नंतर दिवाळी सुद्धा येणार आहे त्यामुळे या सणासुदीच्या दिवसात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचे भाव कमी होण्याऐवजी वाढत आहेत. सोन्याच्या किमतीचा वाढता वेग पाहता सोन्याचा भाव लवकरच 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम पार करेल असे म्हणता येईल. आज म्हणजेच शनिवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत सोन्याच्या किमतीत (गोल्ड प्राइस फॉल) वाढ झाली आहे. 13 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,140 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो आज 58,400 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव कालपर्यंत 53,490 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो आज वाढून 54,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
मध्ये काही दिवस सोन्याच्या भावात जी घसरण झाली होती ती सोन्याने पूर्णपणे भरून काढली आहे. सोन्याच्या किमती याच वेगाने वाढत राहिल्यास सोन्याचे भाव गगनाला भिडतील व सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाऊन बसेल. मात्र, तरीही तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सोने आत्ताच खरेदी करावे. कारण, सणराई आणी लग्नाचा हंगाम सुरू झाल्यानंतर सोन्याचे भाव आणखी वेगाने वाढणार आहेत.
सोन्याची किंमत
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,910 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 54,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची किंमत
आज 1 किलो चांदीची किंमत 69,700 रुपये आहे. गेल्या 24 तासांत चांदीच्या दरात 900 रुपयांची घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत आज लवकरात लवकर चांदीची खरेदी करा. कारण आता दसरा, दिवाळी आणि लग्नाचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे
सोने-चांदीच्या किंमती मिस्ड कॉलवर जाणून घ्या)
जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळवून घेऊ शकता, तुम्ही पुढील 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच सोन्या चांदीचे latest भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
हे देखील वाचा 👉 LPG Cylinder PRICE: गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा कमी होणार! नवीन दर ऐकून सर्व जनता आनंदी.
👉 व्हॉट्सॲप यूजर्ससाठी अतिशय महत्वाची बातमी: 24 ऑक्टोबरनंतर ‘या’ फोनमध्ये चालणार नाही व्हॉट्सॲप, यादी लवकर तपासा.
