Gold Price Today 18 October 2023 : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सलग चढ-उतार सुरू आहेत. कधी सोन्याचा भाव ५९ हजार रुपये प्रति १० ग्रॅम तर कधी ५७ हजार रुपये असा आहे. मात्र, नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. कारण सोने खरेदीची मागणी वाढत चालली आहे अर्थशास्त्रानुसार जशी मागणी वाढणार तसा दर ही वाढत जाणार.
तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका, कारण सोन्याची किंमत 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे जाऊ शकते याचे मुख्य कारण म्हणजे शास्त्रानुसार दसऱ्याला सोने खरेदी करतात व आता दसरा तोंडावर आलेला असून त्यानंतर दिवाळी व दिवाळी संपताच लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे.
आज (18 ऑक्टोबर) भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,280 रुपये (10 ग्रॅम) आहे, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) ची किंमत 54,300 रुपये आहे. म्हणजेच गेल्या 24 तासात सोन्याच्या किमतीत बदल दिसून आले आहेत. चला तर मग सोन्याची खरेदी करण्यापूर्वी त्याची किंमत पाहू:-
22 ते 24 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घ्या
भारताची राजधानी दिल्ली मध्ये काल 17 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,260 रुपये होता, तर आज सोन्याचा भाव 60,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 55,100 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला जात आहे.
अश्या प्रकारे सोने हे 160 रुपये प्रति 10 ग्रॅम ने कमी तर चांदी ही 800 रुपये प्रति किलो ने कमी झालेली दिसून येत आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,950 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,950 रुपये आहे.
याशिवाय आज 1 किलो चांदीचा भाव 69,700 रुपये प्रति किलो इतका नोंदवला जात आहे.
मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या 22 ते 24 कॅरेटचा दर
जर तुम्ही देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कृपया उशीर करू नका. बाजारातील 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता, त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल त्यात तुम्हाला पूर्ण दराची माहिती तपशीलवार दिलेली असेल. अशा रीतीने तुम्ही घरबसल्या सोन्या-चांदीचे आजचे दर जाणून घेऊ शकता.
👉 Diwali Bonus 2023: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने दिली दिवाळी भेट, बोनस जाहीर.
👉 Budhwar Upay : बुधवारी करा लाल किताबातील हे उपाय! मिळेल एका दिवसात आर्थिक तंगीतून मुक्ती.
👉 व्हा दीर्घायुषी! फक्त चहात मिसळा ही गोष्ट, करेल सर्व आजारांवर मात.