Gold Price Today 21 October 2023: आज शारदीय नवरात्रीचा सातवा दिवस आहे. महासप्तमीच्या दिवशी, माता कालरात्री हे दुर्गा देवीचे सातवे रूप आहे. माता कालरात्रीचा रंग काळा असून मातेचे रूप पाहून भीती निर्माण होते. हे मातेचे रौद्ररूप असते.
जसे सरडा आपला रंग सारखा बदलत असतो तसेच सोन्या-चांदीचे भाव हे रोज आपला रंग बदलत असतात म्हणजेच त्यात चढ-उतार होत असतात कधी ते 60000 च्या वर जाते तर कधी ते 55000 च्या आसपास येते. जर तुम्ही आज महासप्तमीला सोना चांदी खरेदी करणार असाल तर तुम्ही अगदी चांगला विचार करत आहात कारण उद्यापासून ते पुढच्या दोन-तीन महिन्यांपर्यंत सोन्याचे दर हे वाढतच जाणार कारण की आता येणार आहे दसरा आणि त्यानंतर दिवाळी आणि जशी दिवाळी संपते तसं लग्नसराई चा हंगाम सुरू होणार आहे.
जर तुम्हाला सणांसाठी म्हणजे दसरा दिवाळीसाठी किंवा तुमच्या घरात एखाद लग्न होणार असेल पुढच्या काही काळात तर तुम्हाला मोठे किंवा जास्त सोने खरेदी करावे लागू शकते यासाठी तुम्हालाही उत्तम वेळ आहे तुम्ही आत्ताच सोने खरेदी करू शकता.
21 ऑक्टोबर 2023 रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,530 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
सोन्याची किंमत
आज 21 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
त्याच वेळी, आज 21 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 61,530 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,400 रुपयांवर पोहोचला आहे.
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, काल संध्याकाळपर्यंत 995 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 60450 रुपयांपर्यंत वाढली होती. 916 (22 कॅरेट) शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55595 रुपयांवर पोहोचली होती. 750 शुद्धतेच्या (18 कॅरेट) सोन्याचा भाव 45520 रुपयांवर आला आहे.
चांदीची किंमत
भारतात 1 किलो चांदीची किंमत 72,000 रुपये आहे. गेल्या 24 तासांत चांदीच्या दरात 700 रुपयांची घसरण झाली आहे.
९९९ शुद्धतेच्या एक किलो चांदीचा भाव काल संध्याकाळपर्यंत ७१९९१ रुपये होता. कृपया लक्षात घ्या की शनिवार आणि रविवारी सोन्या-चांदीच्या किमती जाहीर केल्या जात नाहीत.
Maharashtra gold rate 21 October 2023 today (महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या किंमती मिस्ड कॉलवर जाणून घ्या)
जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळवून घेऊ शकता, तुम्ही पुढील 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच सोन्या चांदीचे latest भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.