Gold Price Today 19 October 2023 | सोने-चांदीचे भाव : गणेशोत्सव नुकताच पार पडला आणि नवरात्रीचा पाचवा दिवस चालू आहे. नवरात्रीच्या काळात रोज बदलणाऱ्या रंगांप्रमाणे सोन्या-चांदीच्या दरात सतत बदल होत असतात. कधी सोन्याचा दर वर तर कधी सोडला तर खाली येताना दिसून येतो. अलीकडे सोन्याच्या भावात थोडीशी स्थिरता आली होती तेवढ्यात इजराइल आणि हमास यांच्या युद्धाने परत सोन्या चांदीच्या दरात चढ-उतार निर्माण केला.
गेल्या आठवड्यात सोन्याचा दर 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम सुद्धा होता आणी कधी 56 हजार रुपयांपर्यंत सुद्धा आलेला. भारतातील २४ कॅरेट/२२ कॅरेट सोन्याचे भाव (१० ग्रॅम) गेल्या २४ तासांत स्थिर राहिले. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत आजचे भाव?
जर तुम्ही सोने चांदी खरेदी करणार असलात तर अजिबात उशीर करू नका कारण की कोणत्याही वृत्तांवर विश्वास ठेवण्यापेक्षा दोन सरळ साधी कारणे की आता दसरा तसेच दिवाळी समोर ठेपावल आहे आणि त्यानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू आहे हमखास सोन्याच्या किमती वाढणार यासाठी आमच्या मताप्रमाणे तुम्ही जर सोने खरेदी करणारा असाल तर लवकरात लवकर करा. कोणत्या क्षणी लक्षणीय वाढ सोन्याचांदीच्या दरात होऊ शकते.
आज (19 ऑक्टोबर) भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,810 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,100 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 55,100 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,950 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,950 रुपये प्रति दहा ग्रॅम होता.
चांदीची किंमत
आपण सर्वजण चांदी नेहमी खरेदी करत असतो कारण घरात पूजा असो किंवा कोणताही सण समारंभ किंवा कोणाला भेट किंवा आहेर देण्यासाठी आपल्याला चांदीच्या समया, चौरंग, ताट, वाट्या इत्यादी वस्तू लागतच असतात आज म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी 1 किलो चांदीची किंमत 69,700 रुपये आहे. भारतातील किमती कालच्या तुलनेत आजही त्याच आहेत. आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
मिस्ड कॉलद्वारे कळेल 22 ते 24 कॅरेटचा दर
जर तुम्ही देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कृपया उशीर करू नका. बाजारातील 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता, त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल त्यात तुम्हाला पूर्ण दराची माहिती तपशीलवार दिलेली असेल. अशा रीतीने तुम्ही घरबसल्या सोन्या-चांदीचे आजचे दर जाणून घेऊ शकता.
👉 Viral Video : ‘आमच्या पप्पांनी आयफोन आणला…’; चिमुकलीचा हा व्हायरल व्हिडीओ पाहिला का?.