Gold Price Today: सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. लग्नाच्या मोसमाआधी दहा ग्रॅम सोने 61,750 रुपयांवर पोहचले आहे. अशा परीस्थितीत सोने चांदी खरेदीचे नियोजन करण्यापूर्वी दहा ग्रॅम सोन्याचा नवीनतम दर नक्की पहा.
Marathimadhun News- भारतीय सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. लग्नसराईपूर्वी दहा ग्रॅम सोने 61,750 रुपयांवर पोहचले आहे. एक किलो चांदीचे दरही वाढले असून आता 1 किलो चांदी 76,500 रुपयांना विकली जात आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सोन्याचा भाव 540 रुपयांनी वाढून 61,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 61,210 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
आज चांदी किती रुपयांवर पोहोचली आहे?
त्याचप्रमाणे दिल्लीत चांदीचा भाव 1,200 रुपयांनी वाढून 76,500 रुपये प्रति किलोवर बंद झाला.
परदेशी बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस $1,984 वर पोहोचला आहे. चांदी 23.86 डॉलर प्रति औंस झाली.
फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर नियंत्रणात ठेवण्याच्या अपेक्षा वाढल्या:
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) सौमिल गांधी यांनी सांगितले की, विदेशी बाजारातील तेजीमुळे सोन्याच्या किमतीला आधार मिळाला. गांधी म्हणाले की, यूएस मॅक्रो डेटामधील कामगार-बाजारातील कमकुवतपणाच्या लक्षणांमुळे सोन्याने नवीन साप्ताहिक उच्चांक गाठला, ज्यामुळे फेडरल रिझर्व्हने व्याजदर नियंत्रणात ठेवण्याची अपेक्षा वाढवली.
मिस्ड कॉलद्वारे सोन्या चांदीचे नवीनतम दर जाणून घेणे खूप सोपे आहे:
विशेष म्हणजे हे दर तुम्ही घरबसल्या सहज पाहू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्या चांदीचे नवीनतम दर पाहू शकता.
👉 Gold identify : दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या खरे आहेत की बनावट, हे आहेत ओळखण्याचे 4 मार्ग.