Gold Price Today 11 October 2023 : जर तुमच्या घरात लग्नकार्य असेल आणि तुम्ही सोने-चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
सध्या सोन्या-चांदीच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहेत. सोने कधी महाग तर कधी स्वस्त होताना दिसत आहे. सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत.
या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. भारतात गेल्या २४ तासांत २४ कॅरेट /२२ कॅरेट सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅम ७९० रुपयांनी वाढल्या आहेत.
दसरा जासजसा जवळ येत आहे तसतसे सोन्याच्या दरातही वाढ होत आहे. आज भारतात 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 57,480 रुपये आहे, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) ची किंमत 52,650 आहे. जाणून घेऊया कोणत्या शहरात सोन्याचा भाव किती आहे ते.
सोन्याच्या किमतीत झाली वाढ | सोन्याचा भाव आज 11 ऑक्टोबर 2023
आज, बुधवारी मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 53,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 58,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर आज 1 किलो चांदीची किंमत 68,500 रुपये आहे.
मिस्ड कॉलद्वारे सोन्याचे दर त्वरित जाणून घ्या
सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या शहरातील नवीनतम सोन्याचे आजचे दर जाणून घेऊ शकता. सोन्याचा आजचा दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. लगेच तुम्हाला एसएमएसद्वारे दराची माहिती मिळू शकते.