Gold Silver Rate Today: हे काय! सोने-चांदीच्या किंमती आजही घसरल्या; जाणून घ्या आजचा सोन्याचा चांदीचा दर 2023,
Gold Silver Rate Today 2023: जागतिक बाजारात सोने-चांदीला उच्च भाव मिळत असला तरी आशियातील बाजारात मात्र चिन्हे वेगळी दिसत आहेत. भारतीय बाजारात तर सोने चांदी दिवसेंदिवस घसरत असल्याचे पाहावंयस मिळत आहे.
सध्या ट्रेंडिंग 👉 उद्या दोन शुभ राजयोग एकत्र येणार; या 4 राशींवर होणार कुबेर आणी शनिदेव मेहरबान, पैशाचा तर पाऊसच शिवाय होतील सर्व मनोकामना पूर्ण!
👉 Ganesh Chaturthi 2023 : घरी गणपतीची स्थापना करताय! मग हे 5 नियम तुम्हाला माहित असलेच पाहिजेत.
सकाळीच आली आनंदवार्ता 👉 गणेश चतुर्थी दिवशीच सोने चांदीच्या दराने घेतली भरारी; आजचा (19 September 2023) सोन्याचांदीचा भाव येथे पाहा.
18 सप्टेंबर 2023 : सोने-चांदीच्या महत्वाबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येक माणसाला सोने चांदी हवेसे वाटते, अंगावर दागिने किंवा घरात वस्तू किंवा लग्न किंवा कोणता ही समारंभ सोन्या चांदी शिवाय अधुरा आहे. आता सनासुदीच्या दिवसात तर याची खूपच गरज पडणार आहे. जागतिक बाजारात अमेरिकन मध्यवर्ती बँकेच्या धोरणांचा परिणाम सोने व चांदी या दोन्ही धातूंना करावा लागत असून आशिया बाजारात उलट स्थिती आहे. त्याच्या बिलकुल उलट भारतीय बाजारात उसळी घेण्यासाठी सोने-चांदी (Gold Silver Price Today 18 September 2023) धडपडत असल्याचे दिसून येते. दोन्ही धातूंमधील पडझड अजूनही थांबलेली नाही. त्यातच पिठोरी अमावस्याचे ग्रहण सोने चांदी खरेदीला लागल्याचे दिसते. त्यातून सोने-चांदीला म्हणावी तशी मागणी आली नाही.म्हणूनच सप्टेंबर महिना ग्राहकांसाठी पावला आहे.
या पंधरवड्यात सोने-चांदीला मोजून तीन-चार वेळाच उच्चान्क दाखवता आला. उर्वरीत काळात घसरणीचे सत्र सुरु आहे. आता अर्धा सप्टेंबर महिना संपला तरी सोने-चांदी आहे तोच भाव गाठायला संघर्ष करत आहे. पण पुढे येणारे सण गणपती, दसरा, दिवाळी पाहता सोने चांदी पुन्हा जोमाने उच्चअंक गाठतील हे नक्की.
सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण
ऑगस्टच्या शेवटच्या सत्रात सोन्याने चांगलीच मुसंडी मारली होती. भावात 800 रुपयांपर्यंत वाढ झाली होती, पण या महिन्यातील पहिल्या 15 दिवसांत सोन्यात घसरणच जास्त दिसून येत आहे. परवा सुद्धा भावात मोठी वाढ दिसली नाही. 16 सप्टेंबर रोजी सोने 400 रुपयांनी स्वस्त झाले, त्यापूर्वी किंमती जवळपास 400 रुपयांनी उतरल्या होत्या 22 कॅरेट सोने 54650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,990 रुपये प्रति 10 ग्रॅम ठरला.
चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
चांदीने या आठवड्यात 500 रुपयांच्या दरवाढीची आरोळी ठोकली पण गेल्या पंधरा दिवसांत चांदीमुळे ग्राहकांची चैनी झाली, त्यांना स्वस्तात चांदी खरेदी करता आली. 13 सप्टेंबर रोजी चांदीत 1000 रुपयाची घसरण झाली. 9 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी भाव घसरले. 8 सप्टेंबर रोजी भावात बदल झाला नसून 7 आणि 6 सप्टेंबर रोजी अनुक्रमे 700 आणि 500 रुपयांची घसरण झाली. 5 सप्टेंबरला सुद्धा 1000, 4 सप्टेंबर रोजी 700, 2 सप्टेंबर रोजी 200 आणि 1 सप्टेंबरला 500 रुपयांनी स्वस्त झाली. सध्या एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये आहे, यावरून असे म्हणता येईल की शेवटच्या 15 दिवसात चांदी जवळपास 5000 रुपयांनी स्वस्त झाली.
Gold Silver Price Today 18 September 2023
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोने 58,697 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,462 रुपये, 22 कॅरेट सोने 53767 रुपये, 18 कॅरेट 44,023 रुपये, 14 कॅरेट सोने 34,338 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,306 रुपयांपर्यंत घसरला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने या भावात आणी दुकानात मिळणाऱ्या भावात फरक दिसून येतो.
हे देखील वाचा 👉 Horoscope Today | 18 सप्टेंबर 2023 | तुमचे सोमवारचे राशीभविष्य.
सोने-चांदीच्या किंमती मिस्ड कॉलवर जाणून घ्या
जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळवून घेऊ शकता, तुम्ही पुढील 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच सोन्या चांदीचे latest भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.