सोन्याचे दर (Gold rate today ): गणेशोत्सव संपला, नवरात्र चालू आहे दसरा उंबरठ्यावर असून काही दिवसांनी दिवाळी आहे, त्यामुळे सराफा बाजारात संपूर्ण महिना गर्दी असणार असून सोन्या-चांदीची मोठी खरेदी होत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सोन्याचा दर 60 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या आकड्यावर पोहोचला आहे. देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर 60,600 रुपये झाला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 55,560 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.
मुंबई हे महाराष्ट्राची जरी राजधानी असली तरी नागपूर ही सुद्धा उपराजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. चला तर मग या दोन शहरातील आजचे सोन्या चांदीचे दर जाणून घेऊया.
22 कॅरेट सोन्याचा दर
मुंबईत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर – रु 55,410
नागपुरात प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर – रु 55,410
24 कॅरेट सोन्याचा दर
मुंबईत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर – 60,450 रुपये
नागपुरात प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर – 60,450 रुपये
चांदीचा दर
देशातील चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर चांदी 74100 रुपये प्रति किलो आहे. चांदी खरेदी करणे सामान्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेर जात असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत चांदी 74100 रुपये प्रतिकिल
सोन्या चांदीचे दर अखेर ठरवते तरी कोण?
देशातील सोने आणि चांदीचे दर IBJA द्वारे जारी केले जातात. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन सोमवार ते शुक्रवार दररोज त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सोने आणि 13 इतर धातूंचे दर जाहीर करते. हे दर शासन मान्य असून ही एक जुनी व विश्वासू संस्था आहे.