whatsapp वर hd फोटो कसे पाठवायचे: व्हॉट्सअॅप वरून आता एचडी क्वालिटीमध्ये फोटो पाठवणे शक्य झाले आहे. कसे ते जाणून घ्या.
आतापर्यंत जेव्हा आपण व्हाय्सअँप वरून फोटो सेंड करत होतो तेव्हा व्हाट्सअँप आपले फोटो कॉम्प्रेस करून समोरच्याला पाठवत असे,
पण आता नवीन अपडेटसह whatsapp ने आता अधिकृतपणे ही कमतरता दूर केली आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेट मध्ये ‘HD’ रिझोल्यूशनमध्ये फोटो पाठवण्याचा एक नवीन पर्याय जोडला गेला आहे,
Whatsapp वर hd फोटो पाठवण्यासाठी व्हाट्सअँप अपडेट करा व खालील स्टेप्स फॉलो करा:
1. WhatsApp उघडा आणि ज्यांना तुम्हाला HD फोटो पाठवायचा आहे ते चॅट निवडा. फोटो सेंड करण्याच्या आयकॉन वर टच करून जो फोटो सेंड करायचा आहे तो सिलेक्ट करा.
2. फोटो-शेअरिंग स्क्रीनवर, तुम्हाला रोटेट आणि क्रॉप सारख्या इमेज एडिटिंग टूल्सच्या पुढे एक नवीन HD बटण दिसेल. त्या HD बटणावर टॅप करा.
3. डीफॉल्टनुसार, स्टॅंडर्ड गुणवत्ता निवडली असेल. याचा अर्थ असा की व्हाट्सएप तुमच्या फोटोचा फाईल साईझ कमी करण्यासाठी कॉम्प्रेस करेल आणि पाठवेल.
4. तुम्हाला फोटो HD गुणवत्तेत पाठवायचा असेल तर, HD quality पर्यायावर टॅप करा.
5. सेंड बटण दाबा.