Gold Price Today : नवरात्री चालू असल्यामुळे जसे नवरात्रीत नऊ दिवस रंग व कपडे बदलतात त्याच प्रमाणे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. कधी सोने स्वस्त होत आहे तर कधी महाग होत आहे. एक वेळ अशी आली की सोन्याचा भाव 56 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला होता मात्र आता पुन्हा सोन्याचा भाव जवळपास ६० हजाराच्या आसपास पोहोचला आहे.
सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अजिबात उशीर करू नका. कारण, दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व तुम्ही दिवाळीनंतर जर खरेदी करणार असाल तर दिवाळीच्या नंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे त्यामुळे इकडे आड तर तिकडे विहीर असल्यामुळे तुम्ही आत्ताच सोने खरेदी करून टाका.
सोन्याच्या किमतीत (Gold Prices) वाढ होताना दिसून येत आहे. आज म्हणजेच शुक्रवार 20 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव (Gold Price Today) वाढीसह व्यवहार होताना दिसत आहेत. भारतात गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात जवळपास 100 रुपयांनी वाढ झाली आहे.
भारतात 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 59,940 रुपये आहे, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) ची किंमत 54,900 रुपये झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच नवीनतम दर तपासा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये.
भारतातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत बदल नोंदवले गेले असून चला तर मग एक नजर टाकूया:-
सोन्याची किंमत
सर्वप्रथम राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,910 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 55,850 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,760 रुपयांवर तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,700 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे.
आजची चांदीची किंमत
भारतात आज म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी 1 किलो चांदीचा दर 71,300 रुपये आहे. गेल्या 24 तासांत चांदीच्या दरात 900 रुपयांची घसरण झाली आहे. तरी दिवाळी पूर्वी तुम्ही चांदी खरेदी करणार असला तर हा उत्तम वेळ आहे.
मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचे आजचे 22 ते 24 कॅरेटचे दर
जर तुम्ही देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कृपया उशीर करू नका. बाजारातील 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता, त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल त्यात तुम्हाला पूर्ण दराची माहिती तपशीलवार दिलेली असेल. अशा रीतीने तुम्ही घरबसल्या सोन्या-चांदीचे आजचे दर जाणून घेऊ शकता.
👉 Rahu Gochar 2023 : या तीन राशींचे नशीब फळफळणार, राहू करतोय या राशीत प्रवेश होतील सर्व इच्छा पूर्ण.