Loan Without Credit Score: कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी क्रेडिट स्कोर चांगला असणे त्याच बरोबर उत्पन्नाचा पुरावा असणे गरजेचे असते, जर तुमच्याकडे हे दोन्ही नसेल तर तुम्ही कर्ज कसे मिळवाल? चला जाणून घेऊया..
बँका विविध कारणांसाठी कर्ज देत असतात. पण कोणत्याही बँकेकडून कर्ज घ्यायचे असल्यास त्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला असावा लागतो व त्याच बरोबर बँकेला उत्पन्नाचा दाखला देखील द्यावा लागतो. यातील दोन्ही गोष्टी नसतील तर बँकेतून कर्ज घेणे खूप कठीण बनते. पण. एक असे कर्ज देखील आहे जे तुम्हाला वरील दोन्ही गोष्टी नसतानाही मिळू शकते आणी तेही वैयक्तिक कर्जावरील व्याजापेक्षा कमी व्याजदरात ते कर्ज म्हणजे (Gold Loan) गोल्ड लोन होय.
गोल्ड लोन (Gold Loan) घेऊन तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करू शकता. गोल्ड लोन लगेच मिळते. बँका आणि NBFC 1.5 कोटी रुपयांपर्यंतचे Gold Loan देतात. हे कर्ज तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता. हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमचे सोने गहाण ठेवावे लागते. बँकेकडे तारण ठेवलेले सोने सुरक्षित राहते. तुम्हाला हवे तेव्हा कर्जाची परतफेड करून तुम्ही तुमचे सोने लगेच परत घेऊ शकता.
CIBIL ची गरज नाही, उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही
गोल्ड लोन हे एक सुरक्षित कर्ज आहे. (Gold Loan) घेण्यासाठी चांगला CIBIL स्कोअर असणे आवश्यक नाही. तसेच बँकेला उत्पन्नाचा कोणताही पुरावा देण्याची देखील गरज नाही. याचे कारण म्हणजे तुम्ही तुमची वस्तू म्हणजेच तुमचे सोने बँकेकडे गहाण ठेवता. यामुळे बँकेचे पैसे बुडण्याचा धोका नसतो. तुम्ही 3 महिने ते 4 वर्षांच्या कालावधीसाठी गोल्ड लोन घेऊ शकता. गोल्ड लोन प्रोसेसिंग फी सामान्यतः एकूण कर्जाच्या रकमेच्या 0.5% + GST इतकी असते
कमी व्याज
सुवर्ण कर्जावरील (Gold Loan Interest Rate) व्याजदरही जास्त नाहीत. त्याचे व्याज वैयक्तिक कर्जापेक्षा कमी आहे. गोल्ड लोनचा व्याज दर वर्षाला ८ टक्क्यांपासून सुरू होतो. Bankbazaar.com नुसार, कोटक महिंद्रा बँक 8 टक्के ते 24 टक्के दराने सुवर्ण कर्ज देते. SBI गोल्ड लोनवर 8.70 ते 9.80 टक्के व्याजदर आहे.