EPFO News: ईपीएफओ पेन्शनधारकांसाठी आजची ताजी बातमी.
EPFO News in marathi : पेन्शनधारकांसाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. EPFO ने पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला असून, EPFO ने पेन्शनधारकांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत अजून वाढवली आहे. आता ही मुदत आणखी काही दिवस वाढवण्यात आल्याचे कळून येत आहे.
ईपीएफओने म्हटले आहे की, या पाऊलामुळे सुमारे 35 लाख पेन्शनधारकांना फायदा मिळू शकतो व जे पेन्शनधारक काही कारणांमुळे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत ते आता प्रमाणपत्र सादर करू शकतात. यासोबतच मंत्रालयाने हे निवेदन जारी करून म्हटले आहे की,
जीवन प्रमाणपत्र सादर करा
यासोबतच कामगार मंत्रालयाकडून एक निवेदन जारी केले असून त्यात असे म्हटले आहे की, वृद्धाचें मृत्यू प्रमाण लक्षात घेऊन ईपीएफओने त्यांच्यासाठी जीवन विमा योजना जाहीर केली आहे. EPS-95 अंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांना प्रमाणपत्राची मुदत ही वाढवली आहे.
नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करता येईल
ईपीएफओने माहिती दिली आहे की अद्याप कोणताही पेन्शनधारक वर्षभरात 30 नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतो. हे प्रमाणपत्र जारी केल्याच्या तारखेपासून 1 वर्षासाठी वैध आहे. नोव्हेंबरपर्यंत प्रमाणपत्र सादर न केल्यास लाखो पेन्शनधारकांची पेन्शन थांबू शकते, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
तरी सर्व पेन्शन धारकांनी आपली तारांबळ होऊ नये यासाठी वेळेतच जीवन प्रमाणपत्र सादरकरावे व आपापल्या हक्काच्या पेन्शन चा लाभ घ्यावा.
सध्या ट्रेंडिंग 👉