Epfo News : खासगी नोकरदारांचे होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान ; व्याजदर कमी होणार? जाणून घ्या आजची ताजी बातमी
EPFO Interest Rate 2023 Update: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO प्रत्येक आर्थिक वर्षासाठी व्याजदर निश्चित करत असते. पीएफ खातेधारकांना संबंधित आर्थिक वर्षात त्यांच्या ठेवींवर व्याज दिले जाते, पण खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, EPFO ला अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळत नाही तोपर्यंत आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी व्याजदर जाहीर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे 7 कोटी पेक्षा जास्त खासगी नोकरदारांना ही बातमी ऐकून हिरेमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ईपीएफओ आली यावर्षी तोट्यात?
EPFO हे कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि सध्या ईपीएफओचे ७ कोटींहून अधिक सदस्य आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार EPF संस्था तोट्यात गेली असल्याचे वृत्त आहे. EPFO कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी पेन्शन योजना व्यवस्थापित करते. २०२१-२२ या आर्थिक वर्षात ईपीएफओची सरप्लस ४४९.३४ कोटी रुपये होती, तर २०२२-२३ या आर्थिक वर्षात ईपीएफओने १९७.७२ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला असून त्यानंतर पीएफवर दिल्या जाणाऱ्या व्याजदराचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पीएफ व्याजदर होणार कमी?
अशा परिस्थितीत खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षेचा एकमेव आधार कमकुवत होऊ शकतो. येत्या काही दिवसांत पीएफवरील व्याज कमी होण्याची शक्यता दिसत आहे. सध्या पीएफवर ईपीएफओने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ८.१५% व्याजदर निश्चित केला आहे.
सध्या पीएफवर मिळतंय सर्वात जास्त व्याज!
सध्या पीएफवर मिळालेल्या व्याजाची बाजाराशी तुलना केली तर ते खरोखरच जास्त आहे. बँका त्यांच्या ठेविवर किंवा मुदत ठेव (fixed deposit ) जवळपास 7% व्याज देते तर अल्पबचत योजनांमध्ये फक्त एक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर सध्या पीएफपेक्षा जास्त (८.२० टक्के) व्याज मिळत आहे. झालेला तोटा भरून काढण्यासाठी व्याजदर कमी करणे हा एक उपाय ठरला जाऊ शकतो.
संबंधित ताजी बातमी 👉 EPFO: पीएफ कर्मचार्यांची हुर्रे; व्याजाच्या पैशांबाबत आली मोठी बातमी!.
PF खात्याची माहिती अपडेट आहे का?
ईपीएफओने अलीकडेच सदस्यांच्या खात्यांमधील नाव, पॅन कार्ड, आधार क्रमांकासह एकूण ११ माहिती अपडेट करण्यासाठी नवीन प्रक्रिया जारी केली. संस्थेने जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार नाव, लिंग, जन्मतारीख, वडिलांचे नाव, नातेसंबंध, वैवाहिक स्थिती, जॉईन होण्याची तारीख, बाहेर पडण्याचे कारण, बाहेर पडण्याची तारीख, राष्ट्रीयत्व आणि आधार क्रमांक अपडेट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
# epfo latest news 18 september 2023# epfo news latest in marathi# EPFO pension latest news today