Pan Card Latest News: केंद्र सरकारने 11.5 कोटी पॅन कार्ड बंद केले आहेत. पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. एका आरटीआयला उत्तर देताना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची तारीख ३० जून असल्याचे सांगितले होते. निर्धारित वेळेत आधार पॅन कार्ड लिंक न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
देशात 70 कोटी पॅन कार्ड आहेत (Pan Card)
देशात पॅन कार्डची संख्या 70.24 कोटींवर पोहोचली आहे. त्यापैकी 57.25 कोटी लोकांनी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले आह. जवळपास 12 कोटी लोकांनी ही प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण केली नाही. त्यापैकी 11.5 कोटी लोकांची कार्डे आता निष्क्रिय करण्यात आली आहेत.
नवीन पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यात आले आहे.
आता नवीन पॅनकार्ड बनवताना ते आधीच आधारशी लिंक करून दिले जानार आहे. आयकर कायद्याच्या कलम 139AA अंतर्गत पॅन कार्ड आणि आधार लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 1 जुलै 2017 पूर्वी ज्यांनी पॅनकार्ड बनवले होते त्यांच्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.
आता 1000 रुपये दंड आकारला जाईल
ज्यांनी पॅन-आधार लिंक केले नाही ते 1000 रुपये दंड भरून त्यांचे कार्ड पुन्हा सक्रिय करू शकतात. नवीन पॅनकार्ड बनवण्याची फी 91 रुपये आहे. मग सरकार यापेक्षा जास्त का आकारत आहे? कार्ड रिऍक्टिव्ह करण्यासाठी 10 पट दंड का भरायचा? लोक आयकर रिटर्नही भरू शकणार नाहीत. सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली जात आहे.
समस्या कोठे निर्माण होतील? (Pan Card)
पॅन कार्ड बंद झाल्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. CBDT नुसार, असे लोक आयकर परतावा मागू शकणार नाहीत. त्यांचे डीमॅट खाते उघडले जाऊ शकत नाही आणि म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयांपेक्षा जास्त ची खरेदी करता येणार नाही. शेअर्स खरेदी आणि विक्रीसाठी तुम्ही 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैश्याचा व्यवहार करू शकणार नाही.
वाहन खरेदीवर जास्त कर भरावा लागेल. बँकेत एफडी आणि बचत खाते वगळता कोणतेही वेगळे खाते उघडता येणार नाही. क्रेडिट आणि डेबिट कार्ड जारी केले जाणार नाहीत. विमा पॉलिसी प्रीमियमसाठी तुम्ही रु. ५०,००० पेक्षा जास्त रक्कम भरू शकणार नाही. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवर जास्त कर भरावा लागणार आहे.
हे देखील वाचा 👉
👉 LPG Cylinder: गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी खुशखबर! एलपीजी सिलेंडरची किंमत होणार खूपच कमी, जाणून घ्या.
👉 RATION CARD NEWS : शिधापत्रिकाधारकांनी हे काम वेळेत पूर्ण केले नाही, तर होईल मोठे नुकसान.
👉 Gold identify : दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या खरे आहेत की बनावट, हे आहेत ओळखण्याचे 4 मार्ग.