Bandhan Bank Saving Account : बंधन बँकेने केली व्याजदरात ‘इतकी’ वाढ, खातेधारक झाले खुश!
Bandhan Bank Saving Account : पूर्वी लोक पैसा हा घरात साठवून ठेवायचीत, भांड्या मध्ये, कापडा मध्ये किंवा जमिनी मध्ये पुरून ठेवायचीत. जसं जसा वेळ बदलला तस तसें पैसा साठवायची पद्धत बदलत गेली. बँकांची निर्मिती झाली आणी काही वेळातच बँकानी ग्राहकांचा पूर्ण विश्वास संपादन केला. आज पैसा साठवून ठेवीचे 100% खात्री शीर ठिकाण म्हणजे बँक बनले आहे. आज प्रत्येक माणसाचे बँकेत खाते असून ते त्यात पैसा साठवत असतात त्याला बचत खाते म्हणतात.
काही लोकांची एकापेक्षा जास्त ही बचत खाती असतात. पण आज सरकारी बरोबरच खाजगी बँका सुद्धा खूप चांगले काम करून दाखवत आहेत. पण जशा बँका वेगवेगळ्या तसें बँकेतील बचत खात्याचे व्याजदर ही वेगवेगळे. त्यात मग वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या खात्यानावर, ठेविवर विशिष्ट व आकर्षक व्याजदर देत असतात.
आजकाल आपण सर्वच जण कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतो . जागा, प्लॉट, फ्लॅट, सोने, शेअर्स पण या सर्वात गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि उत्तम पर्याय म्हणून बचत खाते हा ओळखला . खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असणाऱ्या बंधन बँकेने नुकतेच बचत खात्याच्या व्याजदरात वाढ केली असून त्याचा फायदा बँकेच्या सर्वच लाखो ग्राहकांना होईल.
जर तुम्ही जास्त नफ्यासाठी गुंतवणूक करण्याची योजना शोधत असाल तर तुम्हाला बंधन बँकेच्या एफडीमध्ये (fixed deposit ) गुंतवणूक करता येईल. बंधन बँकेने मुदत ठेवींमधील गुंतवणुकीवरील व्याजदरात वाढ केल्यामुळे ग्राहकांना त्याचा फायदा होईल. तसेच नवीन व्याजदर 5 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.
नवीन व्याजदर किती असेल.
नवीन दर देशांतर्गत बचत खात्यांवर लागू असणार असून ही बँक आपल्या ग्राहकांना 10 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर सर्वात जास्त व्याज देत आहे. यावर ही बँक ७% इतके व्याज देत आहे. इतकेच नाही तर 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 3% आणि 1 लाख ते 10 लाख रुपयांच्या ठेवींवर 6% व्याज बँके देणार आहे.
आता होणार जास्त कमाई
मोठ्या गुंतवणूकीबद्दल बोलायचे झाल्यास 2 कोटी रुपये ते 10 कोटी रुपयांच्या ठेवींवर बँकेच्या ग्राहकांना 6.25% व्याज देण्यात येत आहे. 10 कोटी रुपये ते 50 कोटी रुपयांच्या ठेवींवर 6.50% व्याज देण्यात येत आहे. तसेच बचत खात्यावरील व्याजदराची मोजणी ही दिवसाच्या शेवटी शिल्लक राहिलेल्या रकमेच्या आधारे करतात ही खास बाब. सध्या ही बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 3% ते 7.85% पर्यंत व्याज देत आहे.
त्यामुळे ज्या लोकांना गुंतवणूक ठेवीनद्वारे करायची आहे त्या लोकांसाठी बंधन बँक ही पैसे कामावण्याची आकर्षक योजना घेऊन आली आहे.
हेही वाचा 👉 राज्य सरकार कर्मचारी मालामाल, महागाई भात्त्यात झाली ईतकी वाढ.