7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ दसऱ्याला? मिळाली महत्वाची अपडेट.
सध्या सनासुदीचे दिवस चालू असून गणेश चतुर्थी अगदी काही तासांवर येऊन टेकली आहे तर नवरात्र आणी दिवाळी हे सुद्धा जवळच आले आहेत. या काळात सर्वांनाच पैश्याची गरज असते याचाच विचार करून केंद्र सरकार लवकरच त्यांच्या जवळपास 1 कोटी कर्मचाऱ्यांना खूष खबर देईल म्हणजेच महागाई भत्ता (DA) मध्ये वाढ जाहीर करेल असा अंदाज होता पण सरकारने असे काही केले नाही.
7th Pay Commission News Today : महागाई भत्ता (DA) हा सामान्यता वर्षातून 2 दा जाहीर होतो ते म्हणजे जानेवारी आणी जुलै. सध्या सप्टेंबर महिना संपत आला असला तरी अजून जुलै पासून मिळणाऱ्या महागाई भत्ता (DA) ची अधिकृत घोषणा झालेली नाही. पूर्वी ही वाढ या महिन्याच्या शेवटी व 4% ने होणार असल्याची बातमी होती पण आता या बातमीला खंड पाडत ही वाढ 3% नी होणार असून हिची घोषणा नवरात्री नंतर होईल असं म्हणलं जात आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42% महागाई भत्ता (DA) मिळत आहे म्हणजे आकडेवारी करायची झाली तर समजा तुम्हला 50000 पगार आहे व 25000 बेसिक पगार किंवा मूळ वेतन आहे (एक महत्वाची बाब म्हणजे महागाई भत्ता (DA) हा पूर्ण पगारावर मिळत नसून तो फक्त्त मूळ वेतना वरच मिळतो ) तर तुम्हाला 10500 इतका महागाई भत्ता (DA) मिळतो. आणी समजा आता या जुलै चा महागाई भत्ता (DA) हा 3% नीं वाढला म्हणजे 45% झाला तर तुम्हाला 11250 महागाई भत्ता (DA) मिळणार. म्हणजे थोडक्यात 750 रुपये वाढून मिळणार.
जर हा निर्णय केंद्र सरकारने दिवाळीच्या आधी घेतला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) हा जुलै पासूनच्या वाढीव एरियर बरोबर दिवाळी बोनस ही मिळेल व त्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल.