RBI New Rule: भारतीय रिझर्व बँक ग्राहकांच्या हितासाठी व फायद्यासाठी नवनवीन नियम आणतच असते. ग्राहकांची कोठे फसवणूक किंवा ग्राहकांना त्रास होऊ नये हा यामागचा उद्देश असतो. बँकिंग दिवसेंदिवस सोपी होत जावी यासाठी बँक नवनवीन पावले उचलत असते.
Reserve Bank of India New Rule: बँकांमध्ये प्रामुख्याने दोन कामे होत असतात आपले पैसे ठेवीच्या स्वरूपात ठेवणे आणि दुसरे म्हणजे बँकांकडून कर्ज घेणे. तसे कर्जाचे विविध प्रकार आहेत पर्सनल लोन, होम लोन, गोल्ड लोन पण होम लोन घेणाऱ्यांची संख्या अधिक असते. अशाच Home Loan घेतलेल्यांसाठी ही बातमी महत्त्वाची असून पूर्ण वाचा कदाचित तुम्ही दिवसाला पाच हजार रुपये मिळू शकता.
जेव्हा आपण होम लोन घेतो तेव्हा त्या घराची किंवा फ्लॅटची मूळ (खरी) कागदपत्रे ही बँकेकडे असतात व जेव्हा आपण ते कर्ज पूर्ण फेडतो त्यानंतर ती ओरिजनल कागदपत्रे आपल्याला परत भेटतात. परंतु काही वेळेला या गोष्टीचा वेळ लागतो व ग्राहकांचे नुकसान होते अथवा ग्राहकांना त्रास होतो यावरच आरबीआय ने तोड काढण्यासाठी 1 डिसेंबर 2023 पासून एक नवा नियम लागू करण्यात येत आहे जो की जर ग्राहकाने बँकेचे कर्ज पूर्णपणे भरले असेल तर त्याला त्याच्या घराची मूळ कागदपत्रे 30 दिवसाच्या आत मिळावीत अन्यथा दर दिवसाला 5000 रुपये दंड बँकेला त्या ग्राहकाला द्यावा लागेल.
या नियमाची गरज
आरबीआयकडून हा नियम काढण्याची गरज म्हणजे बँकेचा बेजबाबदारपणा. कारण कर्ज पूर्ण भरूनही त्याची मूळ कागदपत्रे देण्यास उशीर करणे, टाळाटाळ करणे व सारख्या फेऱ्या मारायला लावणे काही गोष्टी तर बँकिंग कडून मूळ कागदपत्रे हरवल्याचेही समोर आले आहे. यात ग्राहकांना त्रास कमी व्हावा म्हणून आरबीआयने हा निर्णय घेतला.
👉 Vastu Upay : फक्त घरात ठेवा हा फोटो, गरिबी संपेल नशीब उजळेल.
👉 50 रुपयांची जुनी नोट आहे मग कमवा लाखो रुपये घरबसल्या! एकदम सोपं आहे.