बँकांना लवकरच सर्व शनिवार सुट्टी असणार : आता बँका फक्त 5
आता सर्व भारतीय बँकांना लवकरच सर्व वीकेंडला सुट्ट्या मिळणार आहेत,
बँक कर्मचारी संघटनांनी प्रत्येक शनिवार बँकेला सुट्टी मिळावी म्हणून केलेली मागणी इंडियाज बँक असोसिएशनने २८ जुलैच्या बैठकीत मान्य केली आहे. म्हणूनच आता भारतीय बँकांच्या व्यवस्थापनाच्या प्रातिनिधिक मंडळाने ही याचिका मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवली आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयानेही त्यास मान्यता दिल्यास बँका आठवड्यातून केवळ पाच दिवसच सुरू राहतील आणि आता कर्मचाऱ्यांना पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी काम करावे लागणार नाही. याशिवाय, शाखांमधील दैनंदिन कामाचे तास ४५ मिनिटांनी वाढवले जातील.
या वर्षाच्या सुरुवातीला, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने एक परिपत्रक जारी केले होते ज्यामध्ये AIBA ने बँक कर्मचार्यांसाठी पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्यास सहमती दर्शवली होती.
हेही वाचा : जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आता भारतात लॉन्च; किंमत बघून कुणाचा विश्वासच बसणार नाही.
• IBPS RRB PO 2023 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे रद्द: संपूर्ण माहिती आत्ताच जाणून घ्या.
AIBA ने असेही नमूद केले आहे की, सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत रोख व्यवहारांसह आणि 4-30 वाजेपर्यंत नॉन-कॅश व्यवहारांसह एकूण कामकाजाचे तास दररोज 40 मिनिटांनी वाढवले जाऊ शकतात.
बँकांच्या पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याशी संबंधित पूर्वी अनेक बैठकांच्या झाल्या आहेत परंतु अद्याप कोणतेही ठोस परिणाम समोर आलेले नाहीत.
यावेळी अर्थ मंत्रालय बँक संघटनांची मागणी मान्य करणार का, हे पाहणे बाकी आहे.