इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटचा राजा कोण? बजाज; ओला की अथर कोण?
Who is the king of the electric scooter market? Bajaj; OLA or Ather electric?
वाढत्या पेट्रोलच्या किमतीमुळे देशभरात इलेक्ट्रिक दुचाकी स्कूटर ची मागणी वाढतच आहे त्यामुळे बाजारात भरपूर कंपन्या मार्केट मध्ये उतरल्या आहेत त्यात (Bajaj) बजाज, (OLA) ओला, (Ather electric) अथर अशा काही कंपन्यांचा समावेश होतो, तर मी आज तुम्हाला सांगत आहे की मार्केट मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी स्कूटर चा बादशाह कोण, ती दुसरी कोणती कंपनी नसून ती ओला (Ola) आहे. का ते खाली वाचा..
ओला (Ola ) या कंपनीचा इलेक्ट्रिक दुचाकी स्कूटर च्या मार्केट मध्ये 30% हिस्सा आहे व दिवसेंदिवस हिची मागणी वाढतच आहे. ओला (Ola ) ने गेल्या महिन्यात 19000 पेक्षा जास्त दुचाक्या विक्री करत विक्रमी नोंद केली व गेल्या वर्षी ऑगस्ट 2022 च्या तुलनेत 400% ने वाढ नोंद केली.
ओला (Ola) सध्या भारतात 4 दुचाक्या गाड्या विकते s1, s1 pro, s1 air आणी s1X तसेच यातील Ola s1 pro हि 15 ऑगस्ट ला लाँच झाली असून फक्त दोनच आठवड्यात हिने रेकॉर्ड ब्रेक 75000 बुकिंग पार केले हिची किम्मत जवळपास 1,40,000/- असून ओला (Ola electric) ची सर्वात स्वस्त s1X असून तिची अंदाजे किम्मत 80,000/- च्या आसपास आहे.
ओला च्या या गाड्यांमध्ये 5 इन्चाचा TFT डिस्प्ले, अँटीथेफ्ट लॉक, ब्लूटूथ, की लेस लॉक अनलॉक अशी काही खास फिचर्स आहेत. तसेच यांमध्ये स्टील ची चाके सुद्धा वापरण्यात आली आहेत. या गाड्यांचा बॅटरी बॅकअप सुद्धा खूप चांगला असून 150km पर्यंतची रेंज देण्यात आली आहे तर हिचा टॉप स्पीड 90km असा आहे.
तर अशाच काही खास कारणांमुळे ओला (Ola electric) ही इलेक्ट्रिक दुचाकी स्कूटर च्या मार्केट मध्ये राजा म्हणून राज्य करत आहे.
सध्या ट्रेंडिंग 👉