18 ऑगस्ट पासून या तीन राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ होईल धनलाभ.
आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती राशीचक्रावर प्रभाव करत असते. प्रत्येक ग्रह हा त्या त्या स्थितीनुसार वेग वेगळे फळ देत असतो. त्यानुसारच शुक्र ग्रह 18 ऑगस्टपासून आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे तीन राशींना त्याचा लाभ होणार आहे.
राशीचक्र अभ्यासात ग्रहणची स्थिती अतिशय महत्वाची असते. प्रत्येक ग्रहाची स्थिती राशीचक्रावर आपला वेगळा करत असते. प्रत्येक ग्रह हे वेग वेगळ्या स्थितीत असतात त्यामुळे त्यांचा राशींवर प्रभाव पडत असतो.
कर्क राशीत असणारा शुक्र ग्रह सध्या अस्ताला गेला आहे. आणी 18 ऑगस्ट 2023 रोजी पहाटे 3 वाजून 20 मिनिटांनी कर्क राशीत उदय पावणार आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबरला तो कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या बदललेल्या स्थितीमुळे तीन राशीच्या लोकांना त्याचा खूप लाभ होणार आहे नशिबाची चांगली साथ मिळणार तसेच मोठा धनलाभ होण्याचेही संकेत आहेत.
या तीन राशींच्या लोकांना मिळेल लाभ
कर्क
शुक्र ग्रहाची बदलेली स्थिती या राशीच्या लोकांना फलदायी असेल. कर्क राशीच्या लग्नभावात शुक्राचा उदय होणार आहे. लग्नभाव हा आत्मविश्वासाशी निगडीत आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात एक वेगळाच बदल दिसून येईल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल. या काळात हाती घेतलेली सर्व कामे मार्गी लागतील.वैवाहिक जीवनात आनंद वाढेल त्याचबरोबर धनलाभ ही मोठ्याप्रमाणावर होईल.
मकर
मकर राशीला देखील शुक्राच्या बदललेल्या स्थितीचा लाभ मिळणार आहे. मकर राशीच्या सप्तम भावात शुक्र ग्रहाचा उदय होणार आहे. शुक्राच्या बदललेल्या स्थितीमुळे व्यवसायिकांना व्यवसायात चांगले यश मिळेल. भागीदारी व्यवसाय असणाऱ्यांना मोठा लाभ होईल. मकर राशीच्या लोकांची रेंगाळलेली सर्व कामे झपाट्याने मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल तसेच आनंदाची बातमी मिळेल.
मीन
मिन राशीच्या चतुर्थ स्थानात शुक्र उदय होणार आहे. चतुर्थ स्थानात शुक्र आल्याने त्याचा मीन राहिच्या लोकांना चांगलाच लाभ होणार आहे. धनलाभ तर होईलच पण त्याचबरोबर मोठी खरेदीही करण्याचा योग आहे. व्यावसायिक लोकांची या काळात चांगली वृद्धी होईल. कोणताही नवीन व्यवसाय सुरु केलातर त्यातून नफाच होईल.
👉 चुकूनही या दिशेला तोंड करून जेवू नका, घरात निर्माण होईल पैशांची कमतरता. जाणून घ्या अन्न खाण्यासाठी वास्तू टिप्स
(Marathimadhun.com अंधश्रद्धेला दुजोरा देत नसून वरील माहिती उपलब्ध स्रोतातून देण्यात आलेली आहे. माहितीच्या तात्थ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही.)