Weekly Numerology : साप्ताहिक संख्या ज्योतिष:( Weekly Number Astrology) ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या जन्माची तारीख, वेळ, दिवस बघून भविष्य सांगितले जाते पण अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे भविष्य सांगितले जाते. साप्ताहिक राशीभविष्यानुसार काही मुळांक असलेल्या लोकांना हा आठवडा खूप लाभदायक ठरणार आहे.
मराठीतील साप्ताहिक अंकशास्त्र: (Weekly Numerology in Marathi) अंकशास्त्रानुसार येणारा आठवडा म्हणजे 22 ऑक्टोबर 2023 ते 28 ऑक्टोबर 2023 हा काळ काही मुळांक असलेल्या लोकांसाठी शुभ असणार आहे. या लोकांना करिअर, लव्ह लाईफ आणि आर्थिक बाबींमध्ये फायदा होईल.
कसा काढाल मुळांक?
मुळांक संख्या जन्मतारखेला जोडली जाते, जसे की 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मुळांक 3 असेल. चला जाणून घेऊया मुळांक 1 ते 9 असलेल्या लोकांची साप्ताहिक कुंडली.
मुळांक 1: मुळांक 1 मध्ये 1, 10, या तारखेला जन्मलेल्या लोकांचा समावेश होतो. मुळांक 1 असलेल्या लोकांसाठी हा आठवडा एकदम खास असणार आहे. तुम्हाला नवीन आव्हाने मिळतील जी तुम्ही सहजपणे हाताळाल व तुमची प्रशंसा होईल. नोकरीमध्ये प्रमोशन किंवा बोनस ची अपेक्षा आहे.
मुळांक अंक 2: मुळांक 2 मध्ये 2, 11, 20, या तारखेला जन्मलेल्या लोकांचा समावेश होतो. या आठवड्यात तुमचे जीवन गोंधळलेले वाटेल परंतु काळजी करू नका. सकारात्मक विचार करा आणि धीर धरा. तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. येणारा काळ चांगला आहे, त्यामुळे या समस्यांना घाबरू नका. तुम्हाला आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
मुळांक 3: मुळांक 3 मध्ये 3, 12, 21,30, या तारखेला जन्मलेल्या लोकांचा समावेश होतो. मुळांक 3 च्या लोकांनी अहंकारापासून दूर राहावे, अन्यथा समस्या येऊ शकतात. करिअर आणि वैयक्तिक जीवनात चांगले बदल घडवून आणण्याची संधी मिळेल. शांततेने काम करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला वैवाहिक जीवनात सुख मिळू शकते.
मुळांक 4: मुळांक 4 मध्ये 4, 13, 22, 31, या तारखेला जन्मलेल्या लोकांचा समावेश होतो. हा आठवडा तुम्हाला चांगल्या संधी देईल आणि तुम्हाला त्या संधीचे लाभही मिळतील. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. घरात चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. लोक तुमची प्रशंसा करतील. या आठवड्यात तुम्ही प्रत्येक क्षण परिपूर्णतेने जगाल.
मुळांक 5: मुळांक 5 मध्ये 5, 14, 23, या तारखेला जन्मलेल्या लोकांचा समावेश होतो. हा आठवडा तुम्हाला आर्थिक लाभ देईल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. पण या काळात तुमचा आतला आवाज ऐकायला विसरू नका. हे तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करेल.
मुळांक 6: मुळांक 6 मध्ये 6, 15, 24, या तारखेला जन्मलेल्या लोकांचा समावेश होतो. तुमचे कुटुंब किंवा मित्र आर्थिक मदतीसाठी विचारू शकतात. गरजूंना मदत करा पण डोळे बंद करून आणि अविचारी मदत कुणाला करू नका. पुढे जाण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर रोमँटिक होऊ शकता. तुमचा स्वतःवरील आत्मविश्वास हा तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करेल.
मुळांक 7: मुळांक 7 मध्ये 7, 16, 25, या तारखेला जन्मलेल्या लोकांचा समावेश होतो.आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या संतुलित करण्याची हीच वेळ आहे. कामावर लक्ष द्या पण स्वतःसाठीही वेळ काढा. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुठेतरी बाहेर सहलीला जाऊ शकता. नवीन लोकांवर लगेच विश्वास ठेवू नका. करिअरमध्येही काही आव्हाने येऊ शकतात.
मुळांक 8: मुळांक 8 मध्ये 8, 17, 26, या तारखेला जन्मलेल्या लोकांचा समावेश होतो. या आठवड्यात तुम्ही अनेक बदलांचे साक्षीदार व्हाल, त्यांना मनापासून स्वीकारणे तुमच्यासाठी चांगले राहील. जुन्या समजुती सोडा. तुम्ही आध्यात्मिक कार्यात सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला मनःशांती लाभेल व तुमचा आठवडा आनंदी राहील.
मुळांक 9: मुळांक 9 मध्ये 9, 18, 27, या तारखेला जन्मलेल्या लोकांचा समावेश होतो. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन आनंद आणि संधी घेऊन येईल. निसर्गाच्या जवळ थोडा वेळ घालवा आणि आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्या. आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. सकारात्मक राहा आणि जीवनाच्या चांगल्या बाजूचा आनंद घ्या.