Vastu Tips | धन आणि आनंदासाठी वास्तु टिप्स : जसे विज्ञानात आणि खगोलशास्त्रात उत्तर दिशेला अधिक महत्त्व प्राप्त आहे त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा आर्थिक प्रगतीसाठी योग्य मानली जाते. चला सविस्तर जाणून घेऊया की घराच्या उत्तर दिशेला वस्तू ठेवल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता का वाढते.
उत्तर दिशेचे महत्त्व : वास्तुशास्त्रानुसार दिशेला खूप महत्त्व आहे. जेव्हा घराचा पाया घातला जातो तेव्हा सर्व प्रथम दिशा सांगितली जाते जेणेकरून घरात सुख-शांती नांदेल. अशा स्थितीत घराची कोणती दिशा सर्वात शुभ मानली जाते हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ जेणेकरून त्या दिशेला वस्तू ठेवल्यास किंवा त्याच दिशेला जरुरी कामे केल्याने आर्थिक लाभ होतो आणि घराच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जाही येते.
घराची उत्तर दिशा का आहे शुभ
वास्तुशास्त्रात घराची उत्तर दिशा सर्वात शुभ मानली जाते. वास्तविक ही दिशा देवी-देवतांचे निवासस्थान मानली जाते. त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला मंदिर बांधून देवाची मूर्ती बसवावी. या दिशेतूनही सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. याशिवाय या दिशेला देवी लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते. ज्योतिष शास्त्रातील सर्व महत्त्वाचे ग्रह उत्तर दिशेलाच असतात त्यामुळे उत्तर दिशेला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे.
भगवान कुबेरांचा आशीर्वाद.
वास्तुशास्त्रानुसार धनाची देवी लक्ष्मी शिवाय घराच्या उत्तर दिशेला कुबेर वास करतात. त्यांचा आशीर्वाद या दिशेने कायम राहतो. या दिशेला लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा केल्याने तिचा आशीर्वाद सदैव राहतो आणि कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. असे केल्याने आपली गरिबी दूर होईल व तुम्ही श्रीमंत होण्यास सुरुवात होईल.
ही झाडे उत्तर दिशेसाठी योग्य
तज्ञांच्या मते मग तो मनी प्लांट असो किंवा पवित्र तुळस. दोन्ही झाडे उत्तर दिशेला ठेवल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तर येतेच पण संपत्तीही वाढते. तुळस घरामध्ये लावण्यामागे एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे तुळस ही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करते.
घराचे स्वयंपाकघर उत्तरेलाच
वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा स्वयंपाकघर बनवण्यासाठी शुभ मानली जाते. स्वयंपाकघर उत्तर दिशेला असल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. धन्य संपन्न समृद्ध घर बनवायचे असेल तर त्या घराचे स्वयंपाक घर उत्तर दिशेला बनवा.
👉 Chandra Grahan 2023 : येणारे चंद्रग्रहण ‘या’ 3 राशींना करणार गर्भश्रीमंत, दिवाळी होणार धूमधडक्यात!.
👉 50 रुपयांची जुनी नोट आहे मग कमवा लाखो रुपये घरबसल्या! एकदम सोपं आहे.