समृद्धीसाठी वास्तू टिप्स, (Vastu Tips For Prosperity) : वास्तूशाश्त्रामध्ये जेवण करण्याबद्दल काही नियम सांगितले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास आपले आरोग्य बिघडू शकते व माता लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न रहाणार नाही.
अन्न खाण्यासाठी वास्तु टिप्स: वास्तुशास्त्रात ऊर्जा आणि दिशांना विशेष महत्त्व आहे. वास्तूशाश्त्रामध्ये प्रत्येक कामासाठी शुभ दिशांची माहिती देण्यात आली आहे. वास्तूमध्ये अन्न खाण्याच्या दिशेशी संबंधित विशेष नियम आहेत. वास्तूशाश्त्राचे हे नियम न पाळल्यास घरात गरिबी येते व माता लक्ष्मी सुद्धा अशा वास्तूमध्ये वास करत नाही. म्हणूनच आपल्यासाठी ह्या अन्न खाण्यासाठी वास्तु टिप्स जाणून घेणे गरजेचे आहे.
जेवणासाठी वास्तु टिप्स
वास्तुशास्त्रानुसार अन्न खाताना दिशांची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार अन्न खाण्यासाठी उत्तर आणि पूर्व दिशा चांगली आहे. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार अन्न खाण्यासाठी दक्षिण दिशा अशुभ मानली जाते. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला तोंड करून अन्न ग्रहण केल्याने व्यक्तीचे वय कमी होते. अन्न खाण्यासाठी पश्चिम दिशा देखील अशुभ मानली जाते. असे मानले जाते की पश्चिमेला तोंड करून अन्न खाल्ल्याने व्यक्तीचे कर्ज वाढते आणी पश्चिम दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्याने घरात दारिद्र्य येते.
घरात जेवण करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. या दोन्ही दिशांना दैवतांची दिशा मानली जाते. असे मानले जाते की पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते आणी अशा घरात देवी लक्ष्मी सदैव वास करते.
Vastu Tips For Eating Food | अन्न खाण्यासाठी वास्तु टिप्स
वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की अन्न नेहमी स्नान केल्यानंतरच स्वच्छ कपडे घालूनच ग्रहण करावे. असे केल्याने माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहते.
वास्तुशास्त्रानुसार कधीही पादत्राने घालून किंवा डोके झाकून अन्न खाऊ नये. असे केल्याने अन्नाचा अपमान होतो.
अंथरुणावर बसून कधीही अन्न खाऊ नये असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो. त्यामुळे घरात पैशांची कमतरता निर्माण होते.
अन्न कधीही हातावर घेऊन किंवा तुटलेल्या भांड्यात खाऊ नये. वास्तुशास्त्रानुसार अन्न खाण्यासाठी उत्तम जागा म्हणजे स्वयंपाकघर किंवा त्याच्या आजूबाजूची जागा.
वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की जेवढे जेवण जाईल तेवढेच जेवण ताटात घ्यावे. जेवताना ताटात अन्न सोडणे हा अन्नाचा अपमान मानला जातो. त्यामुळे घरात पैशांची कमतरता निर्माण होते.
👉 आजचे राशीभविष्य ज्योतिषीय भविष्यवाणी इथे वाचा.
FAQ:
While eating at home, always sit facing east or north direction. Both these directions are considered as the directions of the gods. It is believed that eating food facing the east or north direction gives one good health and Goddess Lakshmi always resides in such a house. (घरात जेवण करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. या दोन्ही दिशांना दैवतांची दिशा मानली जाते. असे मानले जाते की पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते आणी अशा घरात देवी लक्ष्मी सदैव वास करते).
Disclaimer: येथे प्रदान केलेली माहिती केवळ गृहीतके आणि वास्तुशास्त्रसंबंधी उपलब्ध असणाऱ्या माहितीवर आधारित आहे. येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे की Marathimadhun.com ही माहिती तंतोतंत खरी असल्याचा कोणत्याही प्रकारच्या दावा करत नाही. वाचकांना माहिती पुरवणे हाच आमचा उद्देश आहे.