Chandra Grahan 2023 | चंद्रग्रहण 2023 केव्हा आहे : 2023 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 29 ऑक्टोबर रोजी रात्री होणार असून या दिवशी शरद पौर्णिमा देखील आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे यांच्या दिशा व स्थान बदलण्यामुळे शुभ अशुभ योग निर्माण होतच असतात. पण या चंद्रग्रहणाचा तीन राशींवर खूप परिणाम पडणार आहे तर मग चला जाणून घेऊया कोणत्याही त्या तीन राशी.
Chandra Grahan 2023 | चंद्रग्रहण 2023 : चंद्रग्रहण हे धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात, चंद्रग्रहण ही एक महत्त्वाची घटना मानली जाते, जी सर्व राशीच्या लोकांना प्रभावित करते. त्यात ती काही राशीं साठी शुभ ठरते तर काहींसाठी अशुभ. अशा परिस्थितीत हे ग्रहण कोणत्या राशीसाठी जबरदस्त शुभ परिणाम देईल हे जाणून घेऊया.
चंद्रग्रहण 2023 या राशींचे भाग्य बदलेल
मेष
चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांचे झोपलेले भाग्य जागृत होणार आहे. हे ग्रहण तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. त्याच्या प्रभावामुळे पैशाची आवक वाढू शकते, व तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अपूर्ण कामांमध्ये यश मिळू शकते. तुमच्या आयुष्यात काही चांगली बातमी येऊ शकते मग ती तुमच्या होणाऱ्या आपत्या बाबत सुद्धा असू शकते.
मिथुन
या राशीच्या लोकांवर चंद्रग्रहणाचा चांगला परिणाम होईल. त्याच्या प्रभावाने तुम्हाला जीवनात एक नवीन उत्साह मिळेल. तुम्हाला आर्थिक लाभ होईल व त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल. तुमची अधुरी स्वप्न पूर्ण होतील आणि नशीब या कामात तुमची साथ देईल.
धनु
या राशीच्या लोकांसाठीही हे चंद्रग्रहण खूपच फायदेशीर ठरणार आहे. चंद्रग्रहणाच्या प्रभावाने करिअरचे तसेच प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात. व्यवसाय, कला क्षेत्रातील लोकांसाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे. नशीब तुमच्या बरोबर आहे तुम्हाला ज्या गोष्टीत हवे त्या गोष्टीत तुम्हाला नक्की यश मिळणार आहे.
चंद्रग्रहण 2023 कधी आहे :
चंद्रग्रहण रविवार, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १:०५ ते २:२२ पर्यंत राहील. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 1 तास 16 मिनिटे आहे.
चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी :
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे, त्यामुळे येथे सुतक कालावधी हा वैध मानला जाईल. या ग्रहणाचे सुतक दुपारनंतर सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंत राहील. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 02:52 पासून चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होईल. रात्री मंदिरांचे दरवाजे बंद राहतील. खरे तर ग्रहण काळात मंदिराचे दरवाजे बंद असतात. यासोबतच कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे.
चंद्रग्रहण कुठे दिसणार :
भारतासोबतच हे चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, संपूर्ण आशिया, उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका, दक्षिण-पूर्व अमेरिका, हिंद महासागर, दक्षिण प्रशांत महासागर या भागात दिसणार आहे.
👉 Chanakya Niti : चाणक्य नीतिच्या ह्या 10 गोष्टी बदलून टाकतील तुमचे नशीब.
👉 आजचे राशीभविष्य वाचण्यासाठी येथे क्लीक करा.
(Marathimadhun.com अंधश्रद्धेला दुजोरा देत नसून वरील माहिती उपलब्ध स्रोतातून देण्यात आलेली आहे. माहितीच्या तात्थ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही.)