Navratri 2023 Upay In Marathi : नवरात्रीला नऊ दिवस आपण उपवास करतो व देवीची पूजा करतो. नवरात्रीच्या काळात मा दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतील तसेच तुमची प्रगती होऊन तुमची भरभराट होईल.
हिंदू धर्मातील प्रमुख सणामध्ये दिवाळी, गणेशोत्सव त्याचप्रमाणे नवरात्री सुद्धा येते. हा अतिशय उत्सवाचा सण असून आनंदाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवरात्रीची सुरुवात होते. तर यंदा शारदीय नवरात्री १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. हे नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांची रचना केली जाते तसेच नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालून देवीची श्रद्धा जोपासली जाते.
हिंदू धर्मातील जवळपास सर्व प्रकारच्या पूजेमध्ये लवंग आणि कापूर यांचा वापर केला जातो, परंतु शारदीय नवरात्रीमध्ये लवंग आणि कापूर यांच्याशी संबंधित काही उपाय केल्यास देवी माता लवकर प्रसन्न होते आणि सर्व समस्यांपासून मुक्तीही मिळते व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन प्रगती व संपन्नता तसेच भरभराटी मिळते.
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांच्यानुसार नवरात्रीच्या काळात लवंगाचे काही उपाय केले तर आई जगत जननी जगदंबा तर प्रसन्न होतेच पण सुख-समृद्धीसोबतच नशीबही उजळू शकते. यासोबतच नवरात्रीमध्ये लवंग आणि कापूर यांचा उपाय केल्यास अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. चला तर मग पाहूया कोणते आहेत ते उपाय?
2023 नवरात्रीत कापूरसोबत लवंगाचा हा उपाय करा
ज्योतिषशास्त्रानुसार लवंगाची जोडी दुर्गा देवीला अतिशय प्रिय मानली जात असून नवरात्रीमध्ये जगदंबा मातेची पूजा करताना लवंग अर्पण केल्यास त्याचे विशेष फळ मिळते. असे केल्याने माता राणी लवकर प्रसन्न होते व आशीर्वाद देते.
तुम्हाला तुमच्या कामात काही समस्या येत असल्यास किंवा तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या काळात तुम्ही लवंगाची जोडी घेऊन 9 दिवस डोक्यावर सात वेळा ठेवा आणि नंतर दुर्गादेवीच्या चरणी अर्पण करा असे केल्याने नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.
जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर नवरात्रीच्या काळात तुम्ही एका पिवळ्या कपड्यात लवंगाची जोडी ठेवावी, त्यात वेलची घालावी आणि पिवळ्या कपड्यात पाच सुपारी बांधून दुर्गादेवीच्या चरणी अर्पण कराव्यात. त्यानंतर ते आपल्या तिजोरीत ठेवावे. असे केल्यास आर्थिक संकटासह सर्व समस्या दूर होतील. आर्थिक प्रगती होईल व संपन्नता प्राप्त होऊन भरभराटी होईल.
याशिवाय नवरात्रीचे नऊ दिवस दररोज संपूर्ण घराभोवती कापूर आणि लवंगाचा धूर दाखवल्यास घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. यासोबतच जीवनातील सर्व प्रकारच्या समस्याही दूर होतात.
जरी 2023 च्या शतकात तुम्हाला वरील गोष्टी अंधश्रद्धा वाटत असल्या तरी यातून कोणताही प्रकारचे आर्थिक, मानसिक किंवा जीवित कोणत्तेही नुकसान दिसत नाही त्यामुळे एक वेळ मनाच्या शांतीसाठी आणी समाधानासाठी करण्यास काय हरकत आहे. शेवटी हे करून काही नाही मिळाले तरी सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढेल
