Lunar Eclipse 2023 : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण हे भारतात दिसणार आहे. चंद्र, ग्रह, तारे हे आपले स्थान, दिशा बदलत असतात त्यामुळे शुभ, अशुभ योग निर्माण होत असतात. चंद्रग्रहणाचा परिणाम 12 राशींवरही दिसून येणार आहे. काही राशींसाठी तो घातक तर काही राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे.
Lunar Eclipse 2023 : शरद पौर्णिमेला म्हणजे 28 ऑक्टोबरला वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण आहे. पंचांगानुसार हे ग्रहण पहाटे 1.05 वाजता सुरु होणार असून पहाटे 2.25 वाजेपर्यंत असणार आहे. या वर्षातील चार ग्रहणापैकी हे एकमेव चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतक काळ हा 9 तास आधी सुरु होतो. त्यामुळे 28 ऑक्टोबरला दुपारी 4.05 वाजेपर्यंत असणार आहे. चंद्रग्रहण काही राशींसाठी घातक तर काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (The last lunar eclipse after Dussehra will make these zodiac signs rich Diwali will be happy chandra grahan 2023). चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या 3 राशी?
मिथुन (Gemini Zodiac)
या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण या राशीच्या लोकांना लाभदायक ठरणार आहे. या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ होणार आहे. रोजगाराच्या नवीन संधी उपलबद्ध होणार आहे. चंद्रग्रहणाचा शुभ परिणामामुळे या राशींची दिवाळी शुभ होणार आहे. तुमचे जुने अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार असल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.
कर्क (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण वरदान ठरणार आहे. चंद्रदेव तुमच्या दारात सुख आणि समृद्धी घेऊन येणार आहे. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार असून मुलांबद्दल तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. गाडी खरेदीची योग तुमच्या कुंडलीत जुळून आले आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर घरात गाडी येऊ शकते. तसेच जर तुम्ही परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असाल तर हा रस्ता तुमच्यासाठी मोकळा होणार आहे.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
या वर्षांतील शेवटचं चंद्रग्रहण या राशीच्या आयुष्यातील सगळं संकट नाहीसे होणार आहे. चंद्रग्रहणामुळे तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होणार आहे. अचानक तुम्हाला धनलाभ होईल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. ऑफिसमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे व तुम्हाला तुमच्या पत्नीकडून अथवा प्रेयसी कडून खूप प्रेम मिळणार आहे.
👉 50 रुपयांची जुनी नोट आहे मग कमवा लाखो रुपये घरबसल्या! एकदम सोपं आहे.
👉 आजच्या व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा.
(Marathimadhun.com अंधश्रद्धेला दुजोरा देत नसून वरील माहिती उपलब्ध स्रोतातून देण्यात आलेली आहे. माहितीच्या तात्थ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही.)