Samsaptak Rajyog : खगोलशास्त्रात चंद्र, सूर्य, ग्रह, तारे यांना अमूल्य स्थान प्राप्त आहे यांच्या जागा किंवा स्थिती बदलल्यामुळे शुभ अशुभ योग निर्माण होत असतात. ज्याचा प्रभाव मनुष्यजीवन तसेच या पृथ्वीतलावावर दिसून येत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 18 ऑक्टोबरपासून दुहेरी समसप्तक राजयोग तयार होणार आहे. ज्यामुळे खालील 3 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात भरभरून यश मिळणार असून त्यांच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत.
समसप्तक राजयोग
Samsaptak Rajyog / Shani Shukra Yuti : शनि आणि शुक्र हे ग्रह समोरासमोर येणार असून त्याला आपण समसप्तक राजयोग म्हणतो पण याचबरोबर गुरु आणि राहू हे सुद्धा समोरासमोर येणार असल्यामुळे याला आपण डबल किंवा दुहेरी समसप्तक राजयोग म्हणतो.18 ऑक्टोबरपासून दुहेरी समसप्तक योग तयार होत आहे. हे संयोजन जवळपास 94 वर्षांनंतर तयार होत आहे. याचा प्रभाव तसा सर्वच राशींवर दिसून येणार आहे पण त्यातील काही तीन राशी आहेत ज्यांना या काळात अचानक आर्थिक लाभ आणि सौभाग्य मिळू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत…
वृषभ राशी
दुहेरी समसप्तक योगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार असून तुमच्या राशीचा स्वामी शुक्र चौथ्या भावात आहे. तसेच भाग्य आणि करिअरचा स्वामी शनि समसप्तक योग बनवत आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच, नोकरी आणि व्यवसायात थोडी प्रगती होऊ शकते. तुम्हाला कुठेतरी अडकलेले जुने पैसेही मिळतील आणि तुमच्या जीवनात सुख-सुविधा वाढतील. ऑफिसमध्ये तुमची ओळख होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबाकडे तुम्हाला फारसे लक्ष द्यावे लागणार नाही कौटुंबिक सुख लाभेल.
तुळ राशी
दुहेरी समसप्तक योगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कारण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र लाभ स्थानात स्थित आहे. तसेच समोर शनिदेव विराजमान असल्यामुळे यावेळी आर्थिक लाभ होईल. तसेच, बुद्धिमत्तेद्वारे पैसे कमविण्यात यशस्वी व्हाल. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यावेळी यश मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय तुमच्या राशीत त्रिग्रही योगही तयार होत आहे, त्यामुळे तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घ्या. काही दुखापत होऊ शकतेत्यामुळे काळजीपूर्वक वाहन चालवा अथवा प्रवास करा.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी दुहेरी समसप्तक योग अतिशय लाभदायक ठरू शकतो कारण तुमच्या राशीचा स्वामी बृहस्पति फक्त आपल्या घराकडे पाहत असतो व तसेच शुक्र समोर बसला असून मंगळ फक्त तुमच्या घराकडे पाहत आहे. तसेच शनि तिसऱ्या घरात बसला आहे. त्यामुळे धैर्य आणि शौर्य वाढेल. त्याच वेळी, तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात अनपेक्षित प्रगती मिळेल आणि तुम्हाला काही मोठे यश मिळू शकेल. तुमच्या शत्रूंचा पराभव होईल. तसेच, यावेळी तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. जे शुभ सिद्ध होऊ शकतो. तुमची सर्व कामे प्रगतीला लागतील.
हे देखील वाचा 👉 Gold Rate Today : नवरात्रीच्या आधीच रॉकेटच्या वेगाने वाढू लागले सोन्याचे दर; आजचा दर पाहून व्हाल चकित.
👉 LPG Cylinder PRICE: गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा कमी होणार! नवीन दर ऐकून सर्व जनता आनंदी.

👉 आजच्या व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा.
(Marathimadhun.com अंधश्रद्धेला दुजोरा देत नसून वरील माहिती उपलब्ध स्रोतातून देण्यात आलेली आहे. माहितीच्या तात्थ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही.)