Shani Vakri 2023: ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्याय आणि कर्म यांचा देवता अस माणण्यात आल आहे. लोकांचा शुभ, अशुभ काळ हा शनिदेवाच्या भ्रमनावरच अवलंबून असतो जो कि खूप संथ किंवा हळू असते. ज्योतिषशास्त्रात शनीच्या राशीतील बदल हा मनुष्याच्या जीवनात होणाऱ्या गोष्टींवर प्रभाव टाकत असतो.
Shani Vakri 2023 : पंचांगानुसार 17 जून पासून शनी देव हा स्वतःच्या म्हणजे कुंभ राशीत वक्री स्थितीत असल्यामुळे काही राशींना थोड्या समस्याना सामोरे जावे लागू शकते. व याची सुटका ही 4 नोव्हेंबरला होईल कारण शनी 4 नोव्हेंबरला मार्गस्थ होणार आहेत. शनीच्या वक्रीमुळे या कालावधीमध्ये 3 राशींना काही त्रास, समस्या किंवा अडचणी चा सामना करावा लागेल तर बघूया कोणत्या 3 राशीं आहेत त्या.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी शनिदेव आठव्या घरात वक्री असल्यामुळे तुम्हाला आर्थिक क्षेत्रात जास्त सतर्क राहावे लागणार आहे. यावेळी तुम्हाला पैश्याची कमतरता भासू शकते तरी तुम्ही पैशाचा वापर, गुंतवणूक किंवा खर्च हा विचारपूर्वक च करावा. जर तुम्ही नोकरीं करत असाल तर कोणाशी ही बोलताना एकदम नम्रतेने बोला कारण तुमचे शत्रू तुमचा बरोबर भांडण किंवा वाद विवाद घालू शकता. कौटुंबिक जीवनात सुद्धा विशेष लक्ष्य द्या कारण तुमच्या जोडीदाराची मर्जी ही सुद्धा जरूर पाळा नाहीतर तुमच्यात सुद्धा मनमुटावं होऊ शकतात.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनिदेव आता चौथ्या घरात वक्री असून शनि वक्री झाल्यामुळे या राशींच्या व्यक्तींना काही मानसिक समस्यांना जाणवू शकतात. नोकरीं किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त लक्ष्य घालावे लागेल कारण तुमच्या मेहनतीच्या मोबदल्यात पुरेसे यश मिळणार नाही म्हणून थोडी अतिरिक्त मेहनत करावी लागेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी कोणावर ही भरोसा ठेऊ नये अन्यथा तुम्हाला धोखा अथवा तोटा होऊ शकतो. शक्यतो यावेळी कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. तुमच्या रागावर थोडं नियंत्रण ठेवल्यास हा तुमचा काळ ही उत्तम निघून जाईल.
मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी शनि दुसऱ्या घरात वक्री असणार आहे. शनी वक्रीमुळे तुमच्या कुटुंबात वादविवाद किंवा तंटा निर्माण होऊ शकतो. शक्यतो खोटे बोलणे टाळा व तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर विचारपूर्वक द्या किंवा देऊ ही नका, कोणत्याही कारणावरून वाद होऊ शकतात. तुम्ही कुठे नोकरीसाठी मुलाखत वगैरे देणार असाल तर ती 4 नोव्हेंबर नंतरच द्या. मोठे आर्थिक व्यवहार शक्यतो टाळा. स्वतःच्या शरीरावर ही लक्ष्य द्या.
सध्या ट्रेंडिंग 👉
( Disclaimer : वर दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ही केवळ माहिती पुरवीने या उद्देशाने दिली गेली आहे. मराठीमधून.कॉम या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. )