Sankashti Chaturthi September 2023: आज 3 सप्टेंबर रोजी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या आज असणारे शुभ योग आणी चंद्रोदय वेळ.
संकष्टी चतुर्थी सप्टेंबर 2023 :
धार्मिक शास्त्रानुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी व्रत-पूजा केली जाते. याला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. यावेळी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 3 सप्टेंबर, रविवारी आहे, त्यामुळे या दिवशीच हे व्रत केले जाईल. ही चतुर्थी वर्षात येणाऱ्या ४ प्रमुख चतुर्थींपैकी एक आहे. या दिवशी अनेक शुभ योग आहेत, त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे.
संकष्टी चतुर्थी सप्टेंबर 2023 शुभ योग आणी चंद्रोदय वेळ
रविवार, 03 सप्टेंबर रोजी रेवती नक्षत्र, वर्धमान आणि अश्विनी नक्षत्र असल्यामुळे आनंद नावाचा शुभ योग तयार होणार आहे. सिंह राशीमध्ये बुध आणि सूर्य असल्यामुळे बुधादित्य नावाचा राजयोग तयार होईल. याशिवाय या दिवशी सर्वार्थसिद्धी, वृद्धी आणि ध्रुव नावाचे इतर 3 शुभ योग देखील आहेत. या दिवशी चंद्रोदय रात्री 08:57 वाजता होईल, त्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करावी आणि चंद्र उगवल्यानंतर अर्घ्य देऊन व्रत पूर्ण करावे.
हेही वाचा : 👉 आता या 3 राशींच्या लोकांना खरेदी करावी लागेल नवी तिजोरी; विपरीत राजयोगामुळे मिळेल बक्कळ पैसा.
सध्या ट्रेंडिंग 👉
Disclaimer: या लेखात जी माहिती दिली आहे ती ज्योतिषी, पंचांग, धार्मिक ग्रंथ आणि श्रद्धा यावर आधारित आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही फक्त एक माध्यम आहोत. वापरकर्त्यांना विनंती आहे की ही माहिती केवळ माहिती म्हणून विचारात घ्यावी.