दिवाळी दिव्यांचा सण, दिवाळीला पणती लावणे खूप शुभ आणी लाभदायक असते. पण पणती कोणत्या दिशेला आणि कशी लावावी हेही खूप महत्त्वाचे असते.
Diwali 2023: पंचांगानुसार दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरी केली जाते. दिवाळी हा दिव्यांचा सण असून दिवाळीच्या दिवशी सर्वजण पणत्या लावतात. पौराणिक कथेनुसार, रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येला परतले तेव्हा सर्वांनी आनंदाने तुपाचे दिवे लावले. त्यामुळे दसऱ्यानंतर 20 दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीला लक्ष्मी गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी सर्वजण दिवे लावतात आणि दिव्यांनी / पणत्यांनी आपले घर सजवतात. पण, पणती लावण्याशी संबंधित अनेक नियम आहेत जे माहित असले पाहिजेत. तसेच पणती लावण्याची योग्य दिशा माहित असणे आवश्यक आहे. असे न केल्यास लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया दिवाळीला दिवे लावण्यासंबंधित कोणत्या गोष्टी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी दिवाळीला घरात असे दिवे लावा
दिवाळीला दक्षिण दिशेला तोंड करून पणती लावणे अशुभ मानले जाते. कारण दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते आणि दक्षिण दिशेला तोंड करून पणती लावू नये.
पणती लावण्यासाठी सर्वात चांगली आणी योग्य दिशा उत्तर-पूर्व किंवा ईशान्य मानली जाते.
दिवाळीच्या दिवशी घराबाहेर पणती लावण्याअगोदर सर्वप्रथम लक्ष्मी देवीसमोर दिवा लावावा. असे न केल्यास लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते.
आपल्या घरात तुळशीचे झाड असेल तर तुळशीच्या झाडाजवळ पणती ठेवणे देखील खूप शुभ असते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यावरही एक पणती लावावी असे केल्याने देवी अन्नपूर्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो.
दिवाळीला अनेक लोक मेणबत्त्या आणि लाईटचे दिवे लावतात. पण, फक्त तेल किंवा तुपाने पेटवलेले दिवे / पणत्या लावाव्यात.
पणतीत गोल वातीऐवजी एकच लांब वात वापरा. हे शुभ मानले जाते.
महालक्ष्मी-कुबेर यांना प्रसन्न करण्यासाठी घरातल्या तिजोरी जवळ किंवा पैसा ठेवलेल्या ठिकाणी दिवा लावावा.
हे देखील वाचा 👉 500 वर्षानंतर येत्या दिवाळीत ४ राजयोगांचा शुभ संयोग घडून येत आहे; ‘या’ राशींच्या लोकांसाठी असणार हा मोठ्या धनलाभाचा काळ.
(Disclaimer: वर दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. Marathimadhun.com त्याची पुष्टी करत नाही.)