Laxmi Mantra For Money : करा देवी लक्ष्मीच्या या 2 अदभूत मंत्रांचा जाप; होईल धनवर्षा, मिळेल पाण्यासारखा पैसा!
Laxmi Mantra For Money: लक्ष्मी मंत्र: आजकाल राहणीमान उंचावल्याने या धावपळीच्या जगात प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत आहे. यासाठी लोक खूप मेहनत करतात एक काम करून भागत नसल्याने ते अनेक कामे करत असतात आणि काही उपायही शोधतात पण पैसे कोठूनही मिळाले नाही कि मग लोक मनाने दुःखी होतात व आर्थिक व मानसिक दोनी तरहेने निराश होतात आणि शेवटी भगवंताचे स्मरण करत असतात.
पैशासाठी शक्तिशाली लक्ष्मी मंत्र : आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही चमत्कारिक उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्यावर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही व तुमच्या घरातील तिजोरी पैशांनी भरलेली असेल. यासोबतच सर्व समस्यांपासून मुक्ती व समाधान मिळते. चला तर मग जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रातून आर्थिक संकटावर मात करण्यासाठीचे कोणते ते चमत्कारिक उपाय.
बीज मंत्र
“ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नमः” हा बीज मंत्र देवी लक्षमी च्या चमत्कारीक मंत्रा पैकी एक असून याचा जप केल्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. यासोबतच घरात धनाचा वर्षाव होतो. शास्त्रानुसार बीज मंत्र घरातील धन दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी सिद्ध होतो. ज्योतिषशास्त्रानुसार या मंत्राचा जप मनपूर्वक केला तर तो खूप प्रभावशाली ठरतो.
ध्यान मंत्र
वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात पैश्याशी किंवा तिजोरीशी संबंधित समस्या असतात, अर्थात तिजोरी नेहमी रिकामी असते, पैसे साठतच नाहीत तर त्यासाठी देवी लक्ष्मीच्या ध्यान मंत्राचा जप करावा. जे खालील प्रमाणे आहे – “ऊँ श्रीं क्लीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा” या मंत्राचा जप केल्याने तिजोरीतून वास्तुदोष दूर होतील. यामुळे तुमच्या घरात कधीही पैशाची समस्या येणार नाही. ज्योतिष शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ध्यान मंत्र खूप फायदेशीर आहे. या मंत्राचा किमान १०८ वेळा जप केल्याने तुमचं मागण देवी लक्ष्मी लवकरात लवकर पूर्ण करते.
असा विश्वास आहे की तुम्हाला वरील दोन मंत्रा च्या उच्चाराने धन लाभा बरोबरच सुख आणि समृद्धी देखील मिळेल.
सध्या ट्रेंडिंग 👉
(सूचना : वर दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. मराठीमधून.कॉम त्याची हमी देत नाही.)