Dhantrayodashi 2023 : सध्या नवरात्र संपत आली असून आता ह्या पुढचा मोठा सण आहे तो म्हणजे दिवाळी. हिंदू धर्मात दिवाळी ही पाच दिवसांची साजरी केली जाते. त्यातील पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. हिंदीमध्ये धनत्रयोदशीला धनतेरस (Dhanteras) असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर आणि भगवान गणेशाची पूजा केल्याने धन, समृद्धी आणि आनंद वाढतो. तसेच या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने उत्तम आरोग्य लाभते व आपल्या एक उत्कृष्ट व निरोगी शरीर मिळते असे मानले जाते.
हिंदू धर्मात दिवाळी आणि धनत्रयोदशीला (Dhanteras 2023) मोठे महत्त्व दिले गेले आहे. पंचांगानुसार आणी शास्त्रानुसार धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi 2023) दिवशी प्रदोष काळात देवी लक्ष्मी आणि गणेशासह कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करण्याची परंपरा आहे.
पंचांगानुसार यावर्षी त्रयोदशी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:57 पर्यंत चालेल, तर त्रयोदशी तिथीचा प्रदोष काल 5 पासून असेल. 10 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 पर्यंत चालेल. तथापि, धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi 2023) काळात पूजा नेहमी प्रदोष काळातच केली जाते. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. 11 नोव्हेंबरला प्रदोष मुहूर्त नाही.
हा आहे धनत्रयोदशी 2023 चा शुभ मुहूर्त
तथापि, ज्योतिषीय गणनेनुसार, 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:45 ते 7:43 पर्यंत असेल. या दिवशी तुम्हाला धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi 2023) पूजेसाठी 1 तास 56 मिनिटे वेळ मिळेल. या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी, गणेश, कुबेर, श्रीयंत्र आणि धन्वंतरी इत्यादींची पूजा केल्यास शुभ मानले जाते, असे केल्याने हे देव प्रसन्न होऊन आपल्याला इच्छित फळ मिळू शकते.
धनत्रयोदशीचे महत्त्व (Dhantrayodashi 2023 importance)
धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर आणि भगवान गणेशाची पूजा केल्याने धन, समृद्धी आणि आनंद वाढतो. यासोबतच या दिवशी आयुर्वेदाचा देव भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास उत्तम आरोग्य ही प्राप्त होते असे म्हटले जाते. हिंदू धर्मात असे म्हटले जाते की भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध केला व व आपल्या जन्मभूमीवर परतले त्या दिवशी सर्व देशाने घरात तसेच घराबाहेर दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते त्यासाठी हा सण दिवाळी म्हणून साजरा केला जातो असे म्हटले जाते.
2023 धनत्रयोदशी पुजा विधी
आपण नवरात्रीपूर्वीच घराची साफसफाई केलेले असते घर जाणून घेतलेले असते पण तरीपण एकदा दिवाळीच्या आधी एकदा घर झाडून घेतल्यास उत्तम राहते. आपण दिवाळीला सर्वजणच लवकर उठतो व अभ्यंग स्नान करून नवीन कपडे घालतो.
Dhantrayodashi 2023 ला आपल्याला लक्ष्मी, कुबेर, गणपती आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करताना देवी-देवतांना फुले, अक्षत, धूप, दिवा आणि प्रसाद अर्पण करावे. त्यानंतर या देवांची आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावा. याशिवाय घरात व घराबाहेरही दिवा लावा तसेच दिवाळी असल्यामुळे आपण पूर्ण घरभर आणी बाहेर सुद्धा दिवे लावतोच.