Navratri Upvas In Marathi | नवरात्र व्रत विधि: यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात रविवार 15 ऑक्टोबरला घटस्थापनेपासून होणार असून 23 ऑक्टोबरला मंगळवारी दसऱ्याने समाप्त होणार आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसांत दुर्गा देवीची पूजा केली जाते तसेच उपवास केला जातो. नवरात्रीचे पूर्ण फळ जलद प्राप्त करण्यासाठी, नुसता बॉस करून चालणार नाही तर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. चला तर बघूया कोणते आहेत ते नियम.
शारदीय नवरात्री उपवास 2023: हिंदू धर्मात दिवाळी गणेशोत्सव त्याचप्रमाणे नवरात्रीला सुद्धा प्रचंड महत्व प्राप्त आहे. या वेळी माता जगदंबेच्या नऊ रूपांची 9 दिवस पूजा केली जाते. सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी या काळात उपवास केले जातात पण नियमानुसार काटेकोरपणाने त्याचे पालन केले तर त्याची फळप्राप्ती लवकर होऊ शकते.
नवरात्रीच्या उपवासात या गोष्टी लक्षात ठेवा
नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई नक्की करून घ्या. पर्यावरणासोबतच शरीर आणि मनाची स्वच्छताही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे रोज सकाळी लवकर उठा, व्यायाम करा. आणि स्वच्छ कपडे घाला. तसेच कोणाबद्दलही वाईट विचार मनात आणू नका.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेला म्हणजे अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथीला विधीनुसार कलशाची स्थापना करा. शक्य असल्यास घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत अखंड ज्योती पेटवावी असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते.
9 दिवस दररोज सकाळी दुर्गेची पूजा करा आणि संध्याकाळी आरती देखील करा. तसेच माँ दुर्गाला फुले, फळे, मिठाई आणि तिच्या आवडीचा भोग नैवेद्य म्हणून करा. व नंतर सर्वांना वाटा.
नवरात्रीमध्ये माँ दुर्गाला लाल वस्त्र अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. तसेच देवी मातेला लाल वस्त्र चढवल्याने त्या व्यक्तीला माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.
नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन आणि पूजा करा. नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला 9 मुलींना आदरपूर्वक खीर-पुरी खाऊ घाला. मुलींचे आशीर्वाद घ्या आणि त्यांना भेटवस्तू द्या. असे केल्याने माता तुमच्यावर खुश होऊन धनलाभ, सुख, संपत्ती, समृद्धी लवकर भेटू शकते.

नवरात्री 2023 स्पेशल आर्टिकल्स 👉
👉 नवरात्री २०२३: नवरात्रीच्या नऊ दिवसांचे ९ रंग आणी त्यांचे महत्व; जाणून घ्या.
👉 नवरात्री 2023 मंत्र : नवरात्रीचे ९ दिवस करा ‘या’ विशेष मंत्रांचा जप, देवी होईल प्रसन्न करेल धनवर्षा.
👉 नवरात्री 2023 उपाय: नवरात्रीत करून बघा लवंग-कापूरचा हा सोपा उपाय; होईल तुमची भरभराट.
👉 नवरात्री 2023: 400 वर्षांत नवरात्रीत असा शुभ योगायोग कधीच घडला नव्हता; लागा खरेदीला.
👉 Navratri 2023 : येत्या नवरात्रीच्या आधी घरी घेऊन या यातील ‘1’ वस्तू; आपल्यावर होईल लक्ष्मीची कृपा.
👉 चंद्र गोचर 2023: नवरात्री दरम्यान चंद्र देव राशी बदलेल, ‘या’ 4 राशीचे लोक होतील मालामाल.
👉 Navratri 2023: यावेळी हत्तीवर स्वार होऊन येणार दुर्गा माता, नवरात्री 2023 मध्ये हे एक काम नक्की करा.
