Ganesh Chaturthi 2023 : घरी गणपतीची स्थापना करताय! मग हे 5 नियम तुम्हाला माहित असलेच पाहिजेत.
Ganesh Chaturthi 2023 : आपण सर्वजण पूर्ण वर्षभर गणपती बाप्पांची वाट बघत असतो कारण ते आल्यावर घरचे तसेच बाहेरचे सुद्धा वातावरण एकदम आनंददायक व उल्हासदायक बनून जाते. यावर्षी 19 सप्टेंबर ला बाप्पांची स्थापना असून 28 सप्टेंबर ला विसर्जन आहे. जर तुम्हीही तुमच्या घरात गणपती बसवणार असाल तर त्याचे नियम आणि शुभ मुहूर्त नक्की जाणून घ्या.
Ganesh Chaturthi 2023 : दरवर्षी प्रमाणेच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सवाला सुरवात होते या चतुर्थीच्या दिवशी गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. गणपतीच्या जन्मोत्सवाचा हा उत्सव 10 दिवस चालतो. दरम्यान, बाप्पाचे भक्त मोठ्या थाटामाटात गणपतीची मूर्ती घरी आणून प्रतिष्ठापना करतात. त्याची रोज पूजा करतात त्याचा आवडता मोदक हा प्रसाद बनवतात तसेच हसत हसत त्याला निरोप देतात. घरगुती मूर्तीचे विसर्जन पाचव्या ते सातव्या तर मंडळाचे सातव्या किंवा दहाव्या दिवशी केले जाते. महाराष्ट्रात गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर ला असून तुम्हालाही तुमच्या घरात विनायकाची प्रतिष्ठापना करायची असेल तर त्याचे नियम आणि स्थापनेचा शुभ मुहूर्त आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
हे आहेत गणपती स्थापनेचे नियम
1 : शास्त्रानुसार घरगुती गणेशाची स्थापना ही ईशान्य दिशेला करावी. उपासनेच्या व आराधनेच्या दृष्टीकोनातून ही दिशा सर्वात चांगली व शुभ मानली जाते. जर हे शक्य नसेल तर ते उत्तर किंवा पूर्व दिशेला स्थापित केले तरी चालू शकते.
2 : तसेच स्थापनेपूर्वी, पूर्ण घर व विशेषतः ती जागा पूर्णपणे स्वच्छ करन घ्या. जर गंगाजल उपलब्ध असेल तर ते शिंपडून जागा शुद्ध करा. यानंतर स्टूलवर वा टेबल वर लाल किंवा पिवळे कापड पसरून गणेशाची स्थापना करा व त्या ठिकाणी चामड्याची कोणतीही वस्तू ठेवू नये हे खास लक्षात ठेवा.
3 : तसेच एकदा गणपतीची स्थापना झाली तर काहीही झाले तरी त्याची जागा बदलू नका यानंतर देवाकडे तोंड करून शुध्द आसनावर बसून देवाचे पूजा करताना गणपतीला फुले, धूप, दिवा, कापूर, लाल चंदन, दुर्वा आघाडा फळे आणि मिठाई इत्यादी पूजा साहित्य अर्पण करावे. देवाला मोदक आणि लाडू जरूर अर्पण करावेत. गणपतीला या गोष्टी खूप आवडतात असं म्हणतात.
4 : गणपतीला चुकूनही तुळशी अर्पण करू नका. पांढरा पवित्र धागा किंवा पांढरे कपडे देऊ नका. पांढरा पवित्र धागा हळदीने पिवळा केल्यावरच अर्पण करा. याशिवाय फक्त पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करा. पूजेत पांढर्या चंदनाऐवजी पिवळे चंदन वापरावे.
5 : सकाळ संध्याकाळ गणपतीची पूजा करावी. आणि आरती करून नंतर प्रसाद सर्वाना वाटा. श्रीगणेशाची भक्तिभावाने आराधना केल्याने तो प्रसन्न होतो आणि निघताना कुटुंबातील सर्व संकटे दूर करतो, असे म्हणतात. लक्षात ठेवा, गणपती तुमच्या घरी येईपर्यंत कांदा-लसूण, मांसाहार आणि दारू किंवा कोणती ही व्यसने किंवा वाईट सवयी इत्यादी पूर्णपणे टाळा.
सध्या ट्रेंडिंग 👉 Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला अद्भुत योग; या 3 राशीच्या लोकांना होणार गणेश चतुर्थीला मोठा धनलाभ.
तुम्हाला हे नक्की आवडेल 👉 Ganesh Chaturthi 2023 Wishes : गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना या सुंदर कोट्स, शुभेच्छा संदेशांसह गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा द्या.
गणेश चतुर्थी 2023 स्थापनेची शुभ वेळ (Ganesh chaturthi 2023 sthapana time)
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३९ वाजता सुरू होईल आणि १९ सप्टेंबर रोजी दुपारी १:४३ पर्यंत राहील. अशा परिस्थितीत 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा सण साजरा होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी गणपतीच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 10:50 ते 12:52 पर्यंत आहे, सर्वात शुभ मुहूर्त 12:52 ते पहाटे 02:56 पर्यंत आहे.