गणेश चतुर्थी 2023 स्थापना, शुभ मुहूर्त; Ganesh Chaturthi 2023 बद्दल सर्व महत्वाची माहिती जाणून घ्या.
Ganesh Chaturthi 2023 : यंदा राज्यात न्हवे तर पूर्ण देशभरात अगदी मंगलमय वातावरण झालेले आहे कारण आपल्या सर्वांचा आवडता लाडका गणपती बाप्पा हा अगदी काही तासांतच आपल्या सर्वांच्या भेटीसाठी किंवा आगमनासाठी सज्ज झाला आहे. आपण सुद्धा याची आतुरतेने वाट पाहत असतो. यावर्षी गणेशोउत्सव 19 सप्टेंबर ला आहे अ आपण सुद्धा सर्वजण गणेशोत्सव आगमनाची तयारी जोरात केली आहे जसे कि साफसफाई, सजावट, प्रसाद इत्यादी.
पण मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी गणेशोत्सवाला किंवा मूर्ती स्थापनेला असा खास कोणता मुहूर्त नाहीये कारण भद्रा व वैध्रुती योग असला तरीही ब्राम्ह मुहूर्तापर्यंत म्हणजे पहाटे 4 वाजून 50 मिनिटापासून ते दुपारी 1 वाजून 45 मिनीटांपर्यन्त आपण आपल्या घरात श्रीं ची प्रतिष्ठापणा करू शकतो. यामध्ये कोणते ही ग्रहण, विशिष्ठ नक्षत्र, योग वगैरे काही नाहीत.
शास्त्रानुसार यावेळी गणेशाची स्थापना ही याच वेळेमध्ये व 19 सप्टेंबर लाच व्हावी असे म्हणले जात आहे. याचे आणखी एक खास कारण म्हणजे कि सोमवारी दिनांक 18 सप्टेंबर ला दुपारी 12 वाजून 40 मिनीटांनी तृतीया सुरु होणार असून ती मंगळवारी दिनांक 19 सप्टेंबर ला दुपारी 1 वाजून 45 मिनीटांनी संपणार आहे व ही चतुर्थी संपायच्या आतच घरगुती गणेशाची स्थापना करायची आहे.
गणेश उत्सव 2023 च्या महत्वाच्या तारखा | Ganesh Chaturthi 2023 Important Dates
तारीख | वार | सण |
---|---|---|
19 | मंगळवार | गणेश स्थापना |
20 | बुधवार | ऋषी पंचमी |
21 | गुरुवार | गौरी आवाहन |
22 | शुक्रवार | गौरी पूजन |
23 | शनिवार | गौरी विसर्जन |
28 | गुरुवार | अनंत चतुर्दशी |