गणेश चतुर्थी 2023 कधी आहे? (Ganesh Chaturthi 2023 Date)
19 सप्टेंबर 2023, मंगळवार
गणेश चतुर्थी तिथी (Ganesh Chaturthi 2023)
चतुर्थी आरंभ तिथी : 18 सप्टेंबर 2023, दुपारी 12:39 वाजता
चतुर्थी समाप्ती तिथी : 19 सप्टेंबर 2023, दुपारी 1:43 वाजता
गणेश पूजा मुहूर्त (Ganesh Puja 2023 Muhurat)
19 सप्टेंबर 2023, सकाळी 11:00 वाजेपासून दुपारी 1:26 वाजेपर्यंत
Ganesh Chaturthi 2023 : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाला येणाऱ्या चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हणतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी वैधृति योग आहे. व स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्र यांचा संगम होण्याचा दुर्मिळ योगही याच दिवशी असल्याने गणेश चतुर्थीला अद्भुत योग तयार होत आहे, त्यामुळेच पंचांगानुसार ही गणेश चतुर्थी विशेष ठरणार आहे.
या वर्षी गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला आहे. गणेश चतुर्थी 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12:39 वाजता सुरू होईल आणि 19 सप्टेंबर रोजी रात्री 8:43 वाजता संपेल. यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ योग आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला एकत्र तीन शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी ब्रह्म योग, शुक्ल योग आणि शुभ योग असेल. ज्योतिष शास्त्रानुसार ही गणेश चतुर्थी काही राशींसाठी खूप फालदायी ठरणार आहे.
या गणेश चतुर्थीला तीन राशींवर गणेशाची कृपा राहील जाणून घ्या त्या 3 राशी कोणत्या आहेत
मेष (Aries)
ही गणेश चतुर्थी मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय फालदायी ठरणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण होतील. वैयक्तिक जीवनात सुख मिळेल. मुलांच्या बाजूनेही एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आर्थिक दृष्ट्या ही गणेश चतुर्थी आपल्याला अतिशय फालदायी ठरेल.
हे सुद्धा वाचा 👉 Laxmi Mantra For Money : करा देवी लक्ष्मीच्या या 2 अदभूत मंत्रांचा जाप; होईल धनवर्षा, मिळेल पाण्यासारखा पैसा!.
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठीही शुभ योग असून मिथुन राशीच्या लोकांनाही गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायातून चांगला नफा मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे.
मकर (Capricorn)
मकर राशीच्या लोकांना गणेश चतुर्थीच्या दिवसापासून मान-प्रतिष्ठा मिळेल. या दिवशी मंदिरात जाऊन गणपतीची पूजा करावी. मकर राशीच्या लोकांना उत्पन्नाचे मार्ग वाढून नफा मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना देखील त्यांच्या कामातून चांगले उत्पन्न मिळेल.
तुम्हाला नक्क्की आवडेल 👉 गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना या सुंदर कोट्स, शुभेच्छा संदेशांसह गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा द्या.
(टीप : वरील सर्व बाबी marathimadhun.com केवळ माहिती पुरवणे या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून marathimadhun.com कोणताही दावा करत नाही.)