Food Rules And Regulations: वास्तुशास्त्रात दिशा, वेळ आणी दिवस यांना विशेष महत्व प्राप्त आहे. अन्न खाण्याचे ही म्हणजे जेवण करण्याचे ही काही महत्त्वाचे नियम पाळल्यास व्यक्ती सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्त राहू शकतो चला तर जाणून घेऊया खाण्याचे नियम सविस्तर.
जेवण जेवण्याचे नियम : वास्तुशास्त्रात अनेक समस्यांचे समाधान सांगितले आहे, जर एखाद्या व्यक्तीने त्याचे पालन केले तर त्याला अनेक फायदे होऊ शकतात. त्याच वेळी, जर एखाद्या व्यक्तीने या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने अन्न खाण्याचे काही महत्त्वाचे नियम पाळले पाहिजेत.
असे न केल्यास त्याला गरिबीलाही सामोरे जावे लागू शकते. अशा स्थितीत वास्तुशास्त्रामध्ये जेवण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जा तर येतेच पण त्याचबरोबर त्याचे आरोग्य कधीही बिघडणार नाही याची काळजी घेतली जाते.
शास्त्रानुसार कधीही अन्नाचा अपमान करू नये. जे काही मिळते ते देवाचे आभार मानून स्वीकारावे. सर्व प्रथम, घरी जेवण्याचा पहिला नियम असा आहे की एखाद्या व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासह बसून जेवावे. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये एकता आणि प्रेम टिकून राहते, जे फायदेशीर ठरू शकते. जेवताना जास्त गप्पा मारू नये व जेवता जेवता मोबाईल फोन्स चा वापर करू नये.
खाण्यासाठी योग्य दिशा निवडा
अन्न खाण्याची योग्य दिशा देखील वास्तुशास्त्रात सविस्तरपणे सांगितली आहे. ज्यासाठी व्यक्तीने अन्न खाताना घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड ठेवावे. त्यामुळे व्यक्तीमधील नकारात्मकतेची भावना कमी होते. जे त्याच्या स्वभावासाठी व आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
अन्न वाया घालवू नका
वास्तुशास्त्रात अन्नाची नासाडी करणे हे पाप मानले जाते. त्यामुळे अन्न कधीही फेकून देऊ नका, तर गरजेपेक्षा कमी अन्न ताटात घेऊन पूर्ण खावा. अन्न हे शेवटी पूर्णब्रम्हा असते.
ताटात हात धुण्याची चूक करू नका
माणसाने खाल्ल्यानंतर कधीही चुकूनही ताटात हात धुवू नये. खरे तर असे केल्याने घरात गरिबी येऊ शकते. तसेच हाथ धूउन झाल्यावर हाथ शिंपडू नये.
अन्न खाताना कधीही ताटावरून उठू नका. वास्तुशास्त्रानुसार हा अन्नाचा अपमान मानला जातो.

👉 Chandra Grahan 2023 : येणारे चंद्रग्रहण ‘या’ 3 राशींना करणार गर्भश्रीमंत, दिवाळी होणार धूमधडक्यात!.
👉 Venus Transit 2023 : शुक्र होणार मेहरबान! ‘या’ 3 राशींवर धनवृष्टी, मिळणार अमाप पैसा.