राहू गोचर 2023 (Rahu Gochar 2023): नवरात्र चालू असून नवग्रहांचे दिशा, संक्रमण यामुळे शुभ योग बनत आहेत. मीन राशीत राहूच्या संक्रमणामुळे, या राशीच्या विद्यार्थ्यांना काही काळ कठीण जाणार असून त्यांना त्यांच्या अभ्यासावर कदाचित पैसे सुद्धा खर्च करावे लागतील. या काळात राहू संक्रमण मुळे आपली कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते शिवाय नशिबाची साथ प्रत्येक कामात भेटेल त्यामुळे मोठा धनलाभ सुद्धा अपेक्षित आहे.
राहू गोचर 2023 प्रभाव (Rahu Gochar 2023 Effect): आकाशामध्ये सूर्य, ग्रह, चंद्र, तारे हे आपली जागा किंवा दिशा बदलत असतात त्यामुळे शुभ, अशुभ योग तयार होतच असतात, व त्यांचा मानवी जीवनावर खास प्रभाव पडत असतो. आता राहू मीन राशीत प्रवेश करणार आहे. जवळपास या महिन्याच्या 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळी राहू मीन राशीत पोहोचेल. मीन राशीत राहुचे पाऊल सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करेलच पण मेष, वृषभ आणि मिथुन राशीच्या लोकांवर राहूच्या या संक्रमणाचा विशेष प्रभाव पडणार आहे. चला तर मग जाणून घेऊया.
मेष
राहूच्या बदलामुळे मेष राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण अथवा अभ्यासासाठी खर्च वाढेल. अभ्यासासाठी, तुम्हाला पुस्तके किंवा ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र बजेट तरतूद करावी लागेल. जर तुम्हाला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे असेल तर राहु कोणत्याही परिस्थितीत तुमची इच्छा पूर्ण करेल हे समजून घ्या. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आर्थिक स्थिती सुद्धा उत्तम राहील.
वृषभ
मीन राशीतील राहू वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ संकेत घेऊन आला आहे. जर काही कारणास्तव तुमच्या मनात कोणतीही जुनी इच्छा दडपली गेली असेल, परंतु काही कारणास्तव तुम्ही ती पूर्ण करू शकला नसाल, तर आता ती दबलेली इच्छा केवळ समोर येणार नाही, तर ती पूर्ण सुद्धा होऊ शकते. राहू तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करेल. चांगल्या भविष्यासाठी तुम्ही काही योजना आखल्या असतील तर त्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला वाहनसूख भेटू शकते.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना राहु मीन राशीत पोहोचताच एकापाठोपाठ लाभ होण्यास सुरुवात होईल. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की मेहनत हाच तुमचा आधार आहे, त्यामुळे मेहनत करण्यात मागे पडू नका. केवळ कठोर परिश्रमानेच तुम्ही स्वतःसाठी खूप चांगली परिस्थिती निर्माण करू शकाल. जर तुम्ही विवाहित असाल आणि मुलांचे प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते. अपत्यप्राप्तीचा योग मिथुनचे लोकांना लाभत आहे.
👉 Chandra Grahan 2023 : येणारे चंद्रग्रहण ‘या’ 3 राशींना करणार गर्भश्रीमंत, दिवाळी होणार धूमधडक्यात!.
(Marathimadhun.com अंधश्रद्धेला दुजोरा देत नसून वरील माहिती उपलब्ध स्रोतातून देण्यात आलेली आहे. माहितीच्या तात्थ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही.)