Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला सोने, चांदी, धणे आणि भांडी यांच्यासोबतच झाडूही खरेदी करायला हवा. धार्मिक मान्यतांनुसार, या दिवशी झाडू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी घराबाहेर जात नाही तसेच असे मानले जाते की या दिवशी झाडू खरेदी केल्याने जुन्या कर्जापासून मुक्ती मिळते.
दिवाळीचा सण (Diwali 2023) हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. हा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो, जो भाऊबीजला संपतो. पाच दिवस चालणाऱ्या या सणाची तयारी लोक महिनाभर अगोदरपासूनच करतात. धनत्रयोदशीला कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. हिंदू धर्मात धनत्रयोदशीला सोने, चांदी, धणे, भांडी, दिवे तसेच झाडू खरेदी करण्याची परंपरा आहे. या वर्षी धनत्रयोदशी शुक्रवार 10 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी झाडू खरेदी करणे आणि त्याची पूजा करणे खूप शुभ मानले जाते.

धनत्रयोदशीला सोने, चांदी, धणे आणि भांडी यांच्यासोबतच झाडूही खरेदी करायला हवा. धार्मिक मान्यतांनुसार, या दिवशी झाडू खरेदी करणे अतिशय शुभ असते. असे मानले जाते की या दिवशी झाडू खरेदी केल्याने जुनी कर्जे दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू विकत घ्यावा. त्यानंतर त्यावर पांढऱ्या रंगाचा धागा बांधावा, जेणेकरून घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा कायम राहील.
दिवाळी दिवशी पाल दिसली तर फक्त हे करा 👉 Diwali 2023 : दिवाळी दिवशी पाल कशी करते मालामाल? दिवाळी दिवशी पाल दिसली तर काय करावे, जाणून घ्या.
👉 50 वर्षांनंतर धनत्रयोदशीला आलाय हा दुर्मिळ योगायोग, ‘या’ राशींना मिळेल अमाप पैसा आणि प्रतिष्ठा.
झाडूवर पांढरा धागा बांधावा
धनत्रयोदशीला झाडू खरेदी केल्यानंतर त्यावर पांढरा धागा बांधावा जेणेकरून देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरात राहते. त्यानंतर झाडूवर हळद कुंकू लावून अक्षता टाका. या दिवशी भगवान धन्वंतरी आणि कुबेरजींची पूजा करण्याची परंपरा आहे. धन्वंतरीजी हे भगवान विष्णूचे अवतार आहेत असे म्हणतात. मान्यतेनुसार या दिवशी धन्वंतरी आणि कुबेरजींची खऱ्या मनाने पूजा केली तर आरोग्य आणि पैशाशी संबंधित समस्या आयुष्यात कधीच त्रास देत नाहीत.धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वप्रथम गणेशाची पूजा करावी. यानंतर भगवान धन्वंतरी आणि कुबेरजींची पूजा करावी.
हे वाचायला विसरू नका 👉 धनत्रयोदशीला करा हा मीठाचा साधा उपाय, झटक्यात गरिबी दूर होईल आणी भाग्य तुमची साथ देईल.
(सूचना: या बातमीत दिलेली सर्व माहिती आणि तथ्ये गृहितकांवर आधारित आहेत. Marathimadhun.com कोणत्याही तथ्याची पुष्टी करत नाही.)