Chaturgrahi Yog 2023 October in Tula: सध्या गणेशोत्सव चांगल्या रीतीने पार पडला व नवरात्रीचे आगमन होणार आहे व हे नवरात्रीचे आगमन हे खास असणारच आहे कारण की या काळात तूळ राशीमध्ये चार ग्रहांचे एकत्र मिळणार आहेत व चार ग्रह एकत्र आल्यामुळे हा एक शुभ व आर्थिक दृष्ट्या अतिशय लाभदायक योग मानला जातो. याचा परिणाम तुळ राशीवर तर होणारच आहे पण त्याचबरोबर आणखी कोणत्या राशींना होणार आहे ते पाहूया?
प्रत्येक ग्रह एक ठराविक वेळेनंतर स्वतःची स्थिती बदलत असतात व त्या बदललेल्या स्थितीमुळे वेगवेगळे शुभ अशुभ असे योग निर्माण होत असतात. तूळ राशीत आधीपासून बुध, मंगळ आणि केतू विराजमान आहे. त्यामुळे तूळ राशीत ग्रहांचा मेळा असणार आहे. तूळ राशीत सूर्य, बुध, मंगळ आणि केतू यांच्या मिलनातून चतुर्ग्रही योग निर्माण होतो आहे. 15 ऑक्टोबरपासून नवरात्री (Navratri 2023) उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये सूर्यदेव आपली रास बदलणार आहे. 18 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत (Surya Gochar 2023 ) प्रवेश करणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव टाकतो व तसेच ज्योतिषशास्त्रात चतुर्ग्रही योग अत्यंत शुभ आणि विशेष मानला जातो. हा योग 3 राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. (chaturgrahi yog in libra october 2023 at Navratri 2023 will make these zodiac signs rich they will get alot of benefits).
मिथुन (Gemini Zodiac)
तूळ राशीत तयार होत असलेला चतुर्ग्रही योग मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप मोलाचा ठरणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे व त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तसेच तुमचे मनोबल उत्तम राहणार असून समाजात मान-सन्मान वाढणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ झाल्यामुळे सोने चांदी खरेदी करण्याचा योग येऊ शकतो.
कन्या (Virgo Zodiac)
कन्या राशीच्या लोकांना चतुर्ग्रही योगातून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात प्रगती होऊ शकते तर समाजात मानसन्मान वाढू शकतो उत्पन्नाचे नवीन स्त्रोत सुद्धा निर्माण होऊ शकतात
तुमची बऱ्याच काळापासून रखडलेली आर्थिक कामे किंवा एखाद्या रखडलेले जुने काम ते नक्की ह्या काळात पूर्ण होणार व त्यामुळे तुमची पैशांची कमतरता दूर होणार.
मकर (Capricorn Zodiac)
मकर राशीच्या लोकांसाठी सुद्धा चतुर्ग्रही योग शुभ ठरणार असून व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच काही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तरी हा काळ योग्य आहे. याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊन तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होऊ शकतात. तसेच आर्थिक लाभ झाल्यामुळे घरातील वातावरण आनंदायक राहील.
(Disclaimer – वर दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहिती पुरवणे या उद्देशाने दिली जात आहे. Marathimadhun.com या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)