Budhwar Upay In Marathi : तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल अथवा आर्थिक तंगीतून मुक्त व्हायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला जे सांगतो ते बुधवारचे उपाय एकदा नक्कीच करून बघा.
Budhwar Upay : आज बुधवार असून हा दिवस श्री गणेशाला समर्पित आहे. आज काही उपाय करून तुम्ही गणपती बाप्पा ला प्रसन्न करू शकता.
बुधवार उपाय : आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज बुधवार आहे. हा दिवस पार्वतीचा पुत्र गणेश याला समर्पित आहे. बुधवारी लोक उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात. असे मानले जाते की गणपती बाप्पा आपल्या भक्तांवर प्रसन्न झाल्यास त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. गजाननाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय आणि युक्त्या करत असतात. असे काही उपाय खाली दिले आहेत ज्या उपायांनी श्रीगणेश प्रसन्न होतातच, तसेच कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती मजबूत होते. आणि त्यामुळे आर्थिक लाभ, धनलाभ होऊ शकतो.
बुधवारी हे उपाय नक्की करा
बुधवारी श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करा. व गजानना ची मनापासून पूजा करा. यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतो.
बुधवारी तुमची मुलगी, बहीण, मावशी आणि वहिनी अश्या कोणत्या ही घरातील महिलेला यांना मिठाई खाऊ घाला व त्याना नमस्कार करा.
बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घाला. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. व सुख समृद्धी लाभते.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलू नका, कोणाचाही अपमान करू नका. सर्वांचा आदर करा. सर्वांची मदत करा.
बुधवारी पडलेली तुळशीची पाने धुवून खाणे खूप शुभ आहे. असे खाल्याने शरीरातील घाण साफ होण्यास मदत होते. तसेच सर्दी खोकला घसेदुखी यासारख्या किरकोळ आजारांवर सुद्धा मात करता येते.
बुधवारी हिरवे कपडे घाला किंवा खिशात हिरवा रुमाल ठेवा. यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल, असे केल्यामुळे तुमचे मानसिक मनोबल उंचावेल.
बुधवारी 9 मुलींना खाऊ घाला, तसेच मुलींना हिरवे कपडे अथवा रुमाल वाटप करा त्यानंतर त्यांचा आशीर्वाद घ्या हे तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल.
👉 Chandra Grahan 2023 : येणारे चंद्रग्रहण ‘या’ 3 राशींना करणार गर्भश्रीमंत, दिवाळी होणार धूमधडक्यात!.
👉 Lasun Upay : फक्त ‘ह्या’ ठिकाणी ठेवा लसणाची पाकळी; करोडपती व्हायला वेळ लागणार नाही.
👉 आजच्या व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा.
(अस्वीकरण: या लेखात दिलेल्या माहितीची/सामग्री/गणनेची सत्यता किंवा विश्वासार्हता हमी नाही. ही माहिती माहिती/ज्योतिषी/पंचांग/प्रवचने/धार्मिक श्रद्धा/शास्त्र या विविध माध्यमांतून संकलित करण्यात आली आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती पुरवणे हा आहे. कोणत्याही प्रकारे त्याच्या वापराची जबाबदारी स्वतः वापरकर्ता किंवा वाचकांची असेल. Marathimadhun.com याची जबाबदारी घेणार नाही.)